व्यसनमुक्ती साठी कार्यरत संस्थांना मिळणारा अर्थसाह्य.
पात्र केंद्र व संस्थांनी 25 मे पर्यंत करावेत अर्ज.
दिनांक: 18 मे, 2022
*व्यसनमुक्तीसाठी कार्यरत संस्थाना मिळणार अर्थसहाय्य;पात्र केंद्र व संस्थांनी 25 मे पर्यंत करावेत अर्ज*
*: योगेश पाटील*
*नाशिक, दिनांक 18 मे, 2022(जिमाका वृत्तसेवा):*
व्यसनमुक्ती केंद्र व संस्थांना अर्थसहाय्य करण्यासाठी “महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार, पुनर्वसन, प्रचार व प्रसार योजना” राबविण्यात येत असून या योजनेच्या लाभासाठी पात्र व्यसनमुक्ती केंद्र व संस्थांनी 25 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे जिल्हा परिषदेचे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, योगेश पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, या योजने अंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या इच्छुक संस्थांसाठी अर्जाचा नमुना जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नाशिक या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक व पात्र संस्थांनी २५ मे २०२२ पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नाशिक या कार्यालयात विहीत नमुन्यात व आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.
व्यसनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्याचा व युवा शक्तीचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राचे योगदान लक्षात घेता ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत व्यसनाधीन व्यक्तीसाठीचे समुपदेशन करणे व्यसनाचे दुष्परिनाम व्यसनाधीन व्यक्तिंना समजावून सांगणे, व्यसनाधीन रुग्णांवर उपचार करणे, व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करणे यासाठी या केंद्रांना व संस्थांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक या कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.