नाशिक जनमत आज पंढरपूर कडे संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे प्रस्थान झालेले आहे आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथून पालखीसह शेकडो भाविक नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत आज सातपूर येथे मुक्काम असणार आहे दरम्यान गेल्या दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर आषाढी एकादशी साठी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी निघत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे गेल्या दोन वर्षापासून कोरॉना मुळे हा सोहळा अनुभवता आला नाही त्यामुळे वारकरी व भावीक नाराज होते. आषाढी एकादशी पुढील जुलै महिन्यात असून जवळपास 26 मुक्काम करीत पालखी पंढरपूर मध्ये जाणार आहे. याच देही याच डोळा पंढरपूर मधील आषाढी एकादशी सोहळा व पालखी सोहळा यावर्षी अनुभवता येणार आहे. 13 जुलै पर्यंत संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचा मुक्काम पंढरपूर मध्ये राहणार
आहे त्यानंतर अठरा दिवसांमध्ये पालखी त्रंबकेश्वर येथे येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. यावर्षी पालखी मध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले आहेत आज
सातपूर येथे मुक्काम झाल्यानंतर पालखी शिंदे पळसे मार्गे सीन्नर नगर मार्गे पंढरपूर येथे पोहचेल. आळंदीची पालखी देखील 26 जुलैला येणार असल्याची माहिती मिळत आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीीस बंदोबस्त्त पुण्यात येणार आहे तसे पंढरपूर नगरपालिकेतर्फे भावििकाच्याासोयीसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत विठोबाचं दर्शन घेऊन भाविक धन्य धन्य होणार आहे .
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा