मविप्र मॅरेथॉनद्वारे विद्यार्थ्यांना मिळते प्रेरणा : हॉकीपटू रेणुका यादव*
हॉकीपटू रेणुका यादव यांचे नाशिकमध्ये ‘मविप्र’तर्फे स्वागत*
*हॉकीपटू रेणुका यादव यांचे नाशिकमध्ये ‘मविप्र’तर्फे स्वागत*
*मविप्र मॅरेथॉनद्वारे विद्यार्थ्यांना मिळते प्रेरणा : हॉकीपटू रेणुका यादव*
नाशिक :जन्मत मविप्र संस्थेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या मविप्र मॅरेथॉनमध्ये आजवर अनेक राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली आहे. अशा नामवंत खेळाडूंची उपस्थिती आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे विविध स्पर्धेसाठी विद्यार्थी व खेळाडू यांना प्रेरणा मिळते, असे मत रियो ऑलिम्पिक २०१६ मधील भारतीय हॉकी खेळाडू रेणुका यादव यांनी व्यक्त केले.
‘रन फॉर हेल्थ ॲण्ड बिल्ड द नेशन’ हे ब्रीद वाक्य घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित ९ व्या राष्ट्रीय व १४ व्या राज्यस्तरीय ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन’ या स्पर्धेच्या प्रमुख अतिथी रियो ऑलिम्पिक २०१६ मधील भारतीय हॉकी खेळाडू रेणुका यादव यांचे स्पर्धेच्या पूर्वसंध्येला (दि.११) नाशिकमध्ये आगमन झाले. यानिमित्त मविप्रच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी, संचालक व शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मविप्र मॅरेथॉन स्पर्धेबद्दल माहिती देत आयोजकांचे कौतुक केले. त्यांनीदेखील अगदी पाच, दहा किलो मीटर पासून फुल व हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेला असून, अनेकदा पहिला, दुसरा क्रमांक मिळविल्याचे सांगितले.
याप्रसंगी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर,
चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, ॲड. लक्ष्मण लांडगे, डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. रमेशचंद्र बच्छाव, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. भास्कर ढोके, प्रा. डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. नितीन जाधव, प्रा. डी. डी. जाधव, प्रा. डॉ. विलास देशमुख, प्रा. के. एस. शिंदे, डॉ. अजित मोरे, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, प्रा. डॉ. मीनाक्षी गवळी, प्रा. हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
*नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे भारतीय हॉकी खेळाडू रेणुका यादव यांचे स्वागत करताना मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, संचालक, शिक्षणाधिकारी व आयोजन समितीचे सदस्य.*