महाराष्ट्र

27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव ‍दिनाचे आयोजन*

 

*27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव ‍दिनाचे आयोजन*

*दि.२२ फेब्रुवारी, २०२३ (विमाका वृत्तसेवा)*

कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या औचित्याने विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक महानगरपालिका, नाशिक, सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कला मंदिरात दि. २७ फेब्रुवारी,२०२३ रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्य कार्यक्रमापूर्वी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तालय, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषद यांचा कार्यक्रम आयोजनात सहभाग राहणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहात ग्रामगीता, परिसंवाद, गझल संमेलन, निमंत्रितांचे कवी संमेलन अशा दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

*असे आहेत कार्यक्रम*

➡️ग्रंथदिंडी- सकाळी 7.30 ते 9.30

➡️ नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार ‘ग्रामगीता’ कार्यक्रमाचे सादरीकरण 27 फेब्रुवारी,2023 रोजी 12.30 वाजता करणार आहेत.

➡️‘भाषा बदलते की बिघडते’ या विषयावर परिसंवाद दु.1.30 ते 3.30 अध्यक्ष म्हणून डॉ.बी.जी.शेखर पाटील, विशेष पोलीस महा‍निरीक्षक हे उपस्थित राहणार आहेत. वक्ते-डॉ. राम कुलकर्णी,डॉ.अरुण ठोके, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे व किरण सोनार .

➡️कवीसंमेलन’ दु.3.30 ते 5.30 वाजेपर्यंत अध्यक्ष म्हणून श्री.ऐश्वर्य पाटेकर, नाशिक उपस्थित राहणार आहेत.गंगाधर अहिरे, प्राजक्त देशमुख,प्रशांत केंदळे, संदिप जगताप, राजेंद्र उगले, कविता गायधनी, सुरेश पवार, तुकाराम धांडे,विशाल टर्ले, गोरख पालवे,जितेंद्र कुवर, विष्णू थोरे, रविंद्र देवरे, देविदास चौधरी आणि संतोष हुदलीकर हे मान्यवर कवी उपस्थित राहणार आहेत.

➡️‘गझलसंध्या’ सायं 5.30 ते 7.00 वाजेपर्यंत. अध्यक्ष म्हणून गझल अभ्यासक श्री.सुनिल कडासणे उपस्थित राहणार आहेत. गौरवकुमार आठवले, आकाश कंकाळ, राधाकृष्ण साळुंके, संजय गोर्डे, हिरालाल बागुल, गोरख पालवे, रामचंद्र कुलकर्णी, अलका कुलकर्णी, बाळासाहेब गिरी, रावसाहेब कुवर हे मान्यवर गझलकार उपस्थित राहणार आहेत.

*बाल साहित्यिक मेळाव्याचे असे आहेत कार्यक्रम*

➡️दरवर्षी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बाल साहित्यिक मेळावा घेतला जातो. यंदा हा मेळावा सावाना आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. अक्षरबाग बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर सकाळी 11.00 ते 1.00 वाजेपर्यंत नाट्यछटा स्पर्धा.

➡️ मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे दु. 1.30 ते 3.00 वाजेपर्यंत. साहित्यिकांशी गप्पा कार्यक्रमाचे आयोजन. आबा महाजन, राज शेळके,चिदानंद फाळके, चैत्रा हुदलीकर, तृप्ती चावरे-तिजारे व बबन शिंदे उपस्थित राहणार आहेत

➡️ मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे दु. 3.00 ते 4.00 वाजेपर्यंत. छंदात्मक वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सचिन चंद्रात्रे उपस्थित राहणार आहेत. अक्षरबाग बक्षीस समारंभ दुपारी 4.00 ते 5.00 वाजेपर्यंत

➡️प.सा.नाट्यगृहात सकाळी 11.00 ते 12.00 वाजता सावाना स्पर्धेत प्रथम आलेल्या बालनाट्य ‘अद्भुतबाग’, तसेच दु. 12.00 ते 2.00 यावेळेत महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच सादरीकरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे