सर्प चावल्याने सतरा वर्षीय युवतीचा मृत्यू. राजापूर गाव शोक मग्न.
नाशिक जनमत प्रतिनिधी येवला तालुक्यातील राजापूर येथे एका 17 वर्षीय बारावीत असणाऱ्या विद्यार्थिनी स आपल्या आई-वडिलांबरोबर शेतात काम करीत असताना साप चावल्याने मृत्यू झाला आहे यामुळे राजापूर गावावर शोक काळा पसरले आहे. येवला तालुक्यातील राजापूर येथील प्रगती हनुमान वाघ ही बारावी मध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती आई-वडिलांची परिस्थिती गरिबीचे असल्याने आई-वडिलांना नेहमी शेती कामात मदत करत असायची. काल देखील ती आपल्या शेतात सुट्टी असल्याने आई-वडिलांबरोबर शेतात काम करत होती दुपारी साडेबाराच्या दरम्यान तिला सापाने चावा घेतला. यावेळी तिला साप चावल्याचे समजले . व हिम्मत दाखवत आपल्या स्वतःच्या स्कुटीने ती राजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आली याच वेळेस ती बेशुद्ध पडली. दरम्यान ग्रामीण रुग्णालयामध्ये अंबुलन्स वेळेवर हजर नसल्याने तिला खाजगी वाहनांमध्ये येवला येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले . यावेळी तिथे उपचार करण्यात आले दरम्यान उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु अखेर मृत्यू शी सामना करत असताना तिची प्राण ज्योत मालवली ही बातमी राजापूर गावात व नातेवाईकांमध्ये येताच मोठ्या प्रमाणामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्पद्वश च्या च् लस्सी खेडेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील उपलब्ध झाल्या पाहिजे. तसेच आरोग्य सुविधा पुरवताना डॉक्टर या ठिकाणी 24 तास उपलब्ध पाहिजे तसेच अंबुलन्स सेवा 24 तास कार्यरत हवी असे अनेक प्रश्न प्रगतीचा
निधनानंतर आले आहेत. शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रावर कोट्यावधी रुपये खर्च करून देखील आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे मिळत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे प्रगतीला वेळेवर उपचार मिळाला असता तर तिचा जीव वाचू शकला असता असे राजापूर गावातील अनेक नागरिक बोलत आहे. प्रगती ही हुशार विद्यार्थ्यांनी होती वर्गात व गावात सर्वांशी मिळून मिसळून व हसून राहत होती. तिचा निधनामुळे वर्गमित्रिणी नातेवाईक व राजापूरकर यांनी शोक व्यक्त केला आहे. कोब्रा जातीच्या सापाने चावां घेत ला असल्याच मत डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. पुन्हा अशी घटना गावात करू नये यासाठी राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.