चांदोरीत ब्रह्माकुमारीतर्फे अध्यात्मिक प्रदर्शनी व राजयोग शिबिर
मनःशांती व तणाव मुक्तीसाठी राजयोगाची गरज- वासंती दीदी
“मनःशांती व तणाव मुक्तीसाठी
राजयोगाची गरज- वासंती दीदी
चांदोरीत ब्रह्माकुमारीतर्फे अध्यात्मिक प्रदर्शनी व राजयोग शिबिर
नाशिक : प्रतिनिधी
मनोविकाराच्या आहारी जावून माणसाची अधोगती होते. तो दुःखी,तणावग्रस्त आणि अशांत बनत असतो.तेव्हा त्याची आत्मजागृती होऊन परमपिता परमात्म्याने सांगितलेल्या सहज ज्ञान व सहज राजयोगाच्याद्वारे मन:शांती व ताण- तणावमुक्ती होते, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी केले.
चांदोरी येथे श्रीक्षेत्र खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्तब्रह्माकुमारी संस्थेतर्फे अध्यात्मिक विश्व नवनिर्माण प्रदर्शनी व राजयोग शिबिराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर ब्रह्माकुमारी पूनमदीदी, ब्रह्माकुमारी मंगलदीदी,सरपंच विनायक खरात, डॉ.प्रल्हाद डेर्ले, दै.गांवकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत, माजी सरपंच संदीप टर्ले, शिरीष गडाख, वसंत बावीस्कर,डॉ. माणिक आव्हाड मनोहर तांबे, डॉ पवन हिंगणे,मोहन राऊत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ब्रह्माकुमारी वासंती दीदी म्हणाल्या की नकारात्मक विचारामुळे ताणतणाव निर्माण होत असतो.अध्यात्मिक ज्ञानाद्वारे जीवन सुखकारक बनत असते.सर्व गावकरी भाविकांनी अध्यात्मिक चित्रप्रदर्शनी ज्ञान प्राप्त करून राज योग सेवा केंद्रात जाऊन कोर्स करावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.यावेळी प्रमुख अतिथी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी ब्रह्माकुमारी संस्थेचा स्थापनेपासूनच्या कार्याचा उहापोह करत राजयोगाची आवश्यकता व फायदे विशद केले. यावेळी सरपंच विनायक खरात यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत राजयोग सेवा केंद्रासाठी ग्रामपंचायत हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी सरपंच संदीप टर्ले, डॉ.प्रल्हाद डेर्ले यांनी मनोगत व्यक्त केले.
*चौकट- 👇
वासंती दीदी यांना शांतीदूत पुरस्कार
अध्यात्मातून राजयोगाद्वारे मनःशांती व विश्वशांतीच्या प्रचार व प्रसारासाठी पन्नास वर्षाहून अधिक काळ अतुलनीय योगदान दिल्याबद्दल राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांना चांदोरी ग्रामपालिकेतर्फे शांतिदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेकडून कोरोना काळात वैद्यकीय सेवेबद्दल आदर्श डॉक्टर पुरस्काराने डॉ. प्रल्हाद डेर्ले यांना तसेच नवनिर्वाचित मविप्र संचालक शिवाजी गडाख आणि सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपालिका सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन राऊत यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे यांनी केले. यावेळी दशरथ टर्ले, नितीन गायखे, भारत शेटे, भूषण जाधव, खंडू गडाख, संजय सानप, संतु हिरे,संजय बोरसे, मनोहरभाई जगताप, गिरीश शिंपी, राजेंद्रभाई, वैभव व्यवहारे, निखिलभाई, मुग्धा तांबे, संध्या ठमके, सुनयनाबहेन, शालिनीबहेन, राणीमाता, शोभामाता, सुरेखाबहेन, हर्षिताबहेन, आशा माता आदींसह चांदोरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
चांदोरी येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवनिमित्त ब्रह्मकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्यसंचालिका ब्रह्माकुमारी वासंतीदिदी यांना शांतिदूत पुरस्काराने सन्मानित करताना सरपंच विनायक खरात व ग्रामपालिका सदस्यांसमवेत ब्रह्माकुमारी पूनमदीदी, ब्रह्माकुमारी मंगलदीदी, माजीसरपंच संदीप टर्ले, डॉ.प्रल्हाद डेर्ले.