वंजारी सेवा संघ महिला आघाडी व समस्त महिला वर्गाच्या वतीने अबड पोलिस ठाण्यात. निवेदन.
नाशिक जनमत प्रतिनिधी
महाराष्ट्रातील साधुसंतांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य भूमीत वंजारी समाजातील माताभगिनींचा खालच्या पातळीतील अपशब्द वापरून दि.१०/११/२०२३ रोजी फेसबुकच्या माध्यमातून विशेषत्वाने वंजारी समाजाच्या , ओ.बी.सी. समाजाच्या माताभगिनींबद्दल अतिशय खालच्या पातळीला जाऊन जाहीरपणे वक्तव्य करणाऱ्या सचिन लुगडे या नराधमावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही वंजारी सेवा संघ महिला आघाडीच्या वतीने व समस्त वंजारी समाज भगिनींच्या वतीने मी आपणास विनंती करीत आहे. असे निवेदन अबड पोलिस ठाण्यात देण्यात आले.
महाराष्ट्रात १ कोटींपेक्षा जास्त वंजारी समाज आहे. त्यांच्या माताभगिनींबद्दल कुठलाही विचार न करता वाईट प्रतिक्रिया लिहून लुगडे याने समस्त वंजारी समाज व ओ. बी.सी. च्या भावना दुखावल्या आहे. आम्ही सर्व समाज भगिनी आपणास विनंती करतो की, यावर तातडीने कारवाई करावी नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी भगिनी व आमचे सर्व बंधू रस्त्यावर उतरून या सचिन लुगडेची धिंड काढल्यावाचून राहणार नाही, तेव्हा आपण तातडीने सायबर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी ही विनंती.
आज अंबड पोलिस स्टेशन येथे सचिन लुगडे च्या बेताल फेसबूक प्रतिक्रियेबद्दल निषेध व त्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी हे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. प्रमोद वाघ सर यांना दिले. व तातडीने कारवाई करण्याची मागणी मी डॉ. मंजुषा दराडे, प्रदेशाध्यक्षा वंजारी सेवा संघ महिला आघाडी व समस्त महिला वर्गाच्या वतीने केली.