क्रिडा व मनोरंजन

बीसीसीआयच्या कूच बिहार स्पर्धेसाठी नाशिकच्या साहिल पारख, रोहन शेडगे व प्रतीक तिवारी यांची निवड.

 

 

 

१९ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात

 

 

बीसीसीआयच्या कूच बिहार स्पर्धेसाठी

नाशिकच्या साहिल पारख, रोहन शेडगे व प्रतीक तिवारी यांची निवड

 

 

 

 

 

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे साहिल पारख, रोहन शेडगे व प्रतीक तिवारी यांची १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – २०२३ -२४ च्या कूच बिहार करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

 

 

साहिल पारख डावखुरा सलामीवीर असून त्याची नुकतीच एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया डी संघात निवड झाली होती. इंदोर येथे नुकत्याच झालेल्या बी सी सी आय च्या १९ वर्षांखालील विनू मंकड करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघाने बलाढ्य मुंबई संघावर ११५ धावांनी विजय मिळवत विजेतेपद मिळवले. बी सी सी आय च्या या विनू मंकड करंडक स्पर्धेत साहिल पारखने ९ डावांत २ शतके व एका अर्धशतकासह ३६६ धावा फटकावल्या.याआधी १६ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली होती. १७ एप्रिल ते ११ मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , कुमार खेळाडूंसाठी हे शिबीर झाले होते. साहिलची १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघातही निवड झाली होती. सुरत येथे खेळल्या गेलेल्या बी सी सी आय विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्र संघाच्या सिक्कीम संघावरील विजयात साहिलने केवळ १४९ चेंडूत ३५ चौकार व ४ षटकारांसह तूफान फटकेबाजी करत धमाकेदार नाबाद २२४ धावा केल्या व नंतर आसाम विरुद्ध हि अर्धशतक केले होते.

 

 

 

नाशिकच्या डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी याने २०२२-२३ च्या हंगामात ,१९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना विनू मंकड करंडक स्पर्धेतील सामन्यांत जोरदार कामगिरी करून उपांत्य फेरीपर्यंत स्पर्धेत सर्वाधिक बळी घेत , राष्ट्रीय पातळीवर गोलंदाजीत प्रथम स्थान मिळवले. प्रतीकने आठ सामन्यात एकूण १६ बळी अशी अतिशय प्रभावी कामगिरी केली. सात डावात ६२ षटके , २४४ धावा, षटकामागे ३.९३ धावा देत १६ बळी हि त्याची एकंदर कामगिरी झाली. प्रतीकची देखील १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली होती . २४ एप्रिल ते १८ मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी हे शिबीर आले होते.

 

वरील दोघांबरोबरच नाशिकच्या डावखुरा जलदगती गोलंदाज रोहन शेडगेची यंदा २०२३ -२४ च्या विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी निवड झाली होती . त्यानेही विविध वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए इन्विटेशन लीग ) सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

 

 

 

वेळोवेळी झालेल्या अशा राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच साहिल पारख, रोहन शेडगे व प्रतीक तिवारी यांची राष्ट्रीय पातळीवरील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – २०२३ -२४ च्या कूच बिहार करंडक स्पर्धेसाठीनिवड झाली आहे.

 

 

 

२०२३ – २४ च्या कूच बिहार करंडक स्पर्धा १७ नोव्हेंबेर ते १२ जानेवारी दरम्यान येथे होत आहे. महाराष्ट्र संघाचा पहिला सामना १७ नोव्हेंबेर रोजी हैद्राबाद संघाबरोबर होणार आहे.

 

 

 

 

साहिल पारख, रोहन शेडगे व प्रतीक तिवारी या तीन नवयुवकांच्या या महत्वपूर्ण निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकचे अभिनंदन करून यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

साहिल पारख , रोहन शेडगे व प्रतीक तिवारी यांची छायाचित्रे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे