रविवार उद्या नवीन नाशिक पत्रकार संघाचा सन्मान सोहळा.
दै. गांवकरीच्या अश्विनी पांडे यांचा समावेश
सिडको : नाशिक जन्मत प्रतिनिधी नवीन नाशिक पत्रकार संघाच्या वतीने रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स हॉल, सिंचन भवन समोर, दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, उंटवाडी रोड, नाशिक येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांना एक लाखाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी दै. गांवकरीच्या उपसंपादक
अश्विनी पांडे यांचाही पत्रकार भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ना. गिरीश महाजन, खा. राजाभाऊ वाजे, आ. सीमा हिरे, माजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उबाठा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, वंचित महानगरप्रमुख अविनाश शिंदे, भाजपा उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीपं पेशकार उपस्थित राहणार आहेत. म
याप्रसंगी पत्रकारांना सायकल व हेल्मेटचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नवीन नाशिक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा