शहा शिवारात बंधाऱ्याच्य पाण्यात आढळला पुरुषाचा मृतदेह
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील शहा शिवारात शिवाजी घोडेराव यांच्या शेतात असलेल्या बंधाऱ्यात ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली. शिवाजी कारभारी राऊत, रा. शहा असे मृताचे नाव आहे. सकाळच्या सुमारास गावातील शिवाजी सोपान तासकर यांना बंधाऱ्यात मृतदेह तरंगताना आढळून आल्यानंतर त्यांनी तत्काळ वावी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास हवालदार शिंदे करत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा