कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी सामंजस्य महत्वाचे. डॉक्टर संदीप भानुसे.
. कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी सामंजस्य महत्त्वाचे डॉ संदीप भानोसे
सध्याच्या स्पर्धात्मक युगात कौटुंबिक नाती विरळ बनत चालली आहे. कुटुंबात कलह व ताणतणाव वाढत आहेत.
अशावेळी एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन औद्योगिक कीर्तनकार डॉ संदीप भानोसे यांनी केले.
_*सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळा!!!*_ निमित्त
*गुरुवार दिनांक 2 /6 /2022 रोजी हॉटेल रुद्राय निफाड येथे जि. प प्राथमिक शाळा डोंगरगाव शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय* _*श्री भाऊसाहेब यशवंत कांगणे सरचिटणीस – अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ तालुका निफाड यांचा सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा*_ *मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गरुडझेप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष- औद्योगिक कीर्तनकार सन्माननीय श्री डॉक्टर संदीपजी भानोसे सर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब पाटील निकम, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चिंतामण पाटील सोनवणे, त्याचबरोबर शिक्षण विस्ताराधिकारी लहामगे सर हे व्यासपीठावर विराजमान होते. सुरूवातीला दिपप्रज्वलन सरस्वती मातेचं प्रतिमा पूजन केल्यानंतर- कार्यक्रमाचे प्रास्ताविक छोटे बंधू प्रकाश कांगणे सर यांनी केले. आणि मुख्य सत्कार श्री चिंतामण पाटील सोनवणे, संदीपजी भानोसे सर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात केला, तद्नंतर मनोगतामध्ये वाघ सर, पुतण्या सर्वेश कांगणे, मुलगा दुर्गेश कांगणे, कर्डिले सर, लहामगे सर, निकम् पाटील सर, चिंतामण सोनवणे साहेब आणि सत्कारमूर्ती भाऊसाहेब कांगणे यांनी आपापली मनोगत व्यक्त केले या सर्वांहून शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर संदीपजी भानोसे सर यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले व आजच्या काळात प्रत्येक कुटुंबाने कसे सलोख्याचे संबंध ठेवले पाहिजे याविषयी परिपूर्ण माहिती दिली. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कोथमिरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व आप्तस्वकीय नातेवाईक, कुणाल कांगणे व कांगणे परिवार यांनी परिश्रम घेतले.!!!*