माझी वसुंधरा अभियानात नाशिक विभागाची कामगिरी सर्वोत्तम;
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा पर्यावरण दिनी शासनाच्या वतीने होणार सन्मान
माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. माझी वसुंधरा अभियान २.० मधील नाशिक विभागाची कामगिरी सर्वोत्तम झाली असल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी आ विभागाने केलेल्या या कामगिरी बाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांचे वतीने श्री. गमे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.!
माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा रविवार दिनांक ५ जून, २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता मा. मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली, मा. उप मुख्यमंत्री, मा. मंत्री, महसूल, मा. मंत्री, नगर विकास, मा. मंत्री, ग्राम विकास, मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता, मा. मंत्री पर्यावरण व वातावरणीय बदल आणि मा. राज्यमंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल यांचे उपस्थितीत टाटा थिएटर, एन.सी.पी.ए., नरीमन पाईट, मुंबई ४०००२१ येथे आयोजित करण्यात आला आहे.