सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने निरोप व सत्कार

*सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने निरोप व सत्कार
नाशिक जनमत. वृत्तसेवा चंद्रकांत धात्रक यांच्याकडून डी. डी. शिंदे, उपायुक्त (आस्थापना), प्रदीप पोतदार उपयुक्त (नियोजन)व यशवंत चव्हाण नायब तहसीलदार (आस्थापना) हे प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने या तिन्ही अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त
कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी उपायुक्त (महसूल) संजय काटकर, उपायुक्त पुनर्वसन उन्मेष महाजन, उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेवार, सहायक आयुक्त (विकास) मनोज चौधर, सहायक आयुक्त भू सुधार विठ्ठल सोनवणे, तहसीलदार (आस्थापना) कुंदन हिरे आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपायुक्त (महसूल) संजय काटकर यांना नुकतीच भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी विभागीय आयुक्त श्री गमे यांच्या हस्ते करण्यात आला.