ब्रेकिंग

समृद्धी महामार्गावर अपघात 25 जणांचा कोळसा. ओळख पटत नाही. सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय

“नाशिक जनमत.  डिसेंबर मध्ये लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत छोटे-मोठे 449 अपघात झाले त्यात कालचा अपघात सर्वात मोठा झाला असून आत्तापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती एम एस आर टी सी चे व्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी दिले आहे. वाहण धारकांसाठी हा महामार्ग धोकेदायी ठरत आहे. शनिवारी नागपूर कडून पुण्याकडे निघालेल्या बसमध्ये जवळपास 35 प्रवासी होते रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सर्वजण एका हॉटेलवर जेवणास उतरली होती. जेवण झाल्यावर सर्वजण गाडीमध्ये झोपी गेली होती दरम्यान एक वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान बस वरील ताबा सुटून गाईड पोल्ला धडक बसली. व त्यानंतर उजवी बाजू पुलाच्या साईट ला घासत केली. यानंतर गाडीच्या डिझेल टॅंक फुटल्याने डिझेल गाडीमध्ये असते व्यस्त पसरले व गाडीचा घर्षणाने गाडीला आग लागली.आसावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बस चालक दानिश शेख

 

 

यांनी सांगितले ही बस वेगात असताना टायर फुटल्याने हा अपघात झाला. मात्र आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दावा  खोटा असल्याचे स्पष्ट झाले.असे बुलढाणा चे मोटर वाहन निरीक्षक भंडारी यांनी म्हटले आहे . यातील पोलीस  कर्मचारी शशिकांत यांनी सांगितले की पुण्याकडे जाणारी विदर्भ एक्सप्रेस पाच वाजून तीस मिनिटे वाजता नागपूरहून निघाली. ते पण यवतमाळ जिल्ह्यात बसले होते त्यांची शेवटची सीट होते कारण ज्याला बस थांबली तिथे सर्वांनी जेवण केले पुन्हा बस पुढे निघाली सर्वांना झोप लागली होती मध्यरात्री अचानक माझ्या अंगावर चार-पाच माणसे येऊन पडली त्यामुळे मी जागा झालो बघतो तर काय सर्वत्र दूरवरून सुरू होती श्वास मरत होता मी ताबडतोब जागा मिळेल तिथे पाय ठेवत वर चढलो पूर्ण ताकद लावून पाठीमागची काच फोडली तितक्यात एखादी माझे पाय ओढले व माझ्या अंगावर चढून तो बाहेर पडला पाठोपाठमी ही बाहेर पडलो उत्तरप्रदेश यांनाही मदतीसाठी हात दिला पण आगीच्या ज्वालामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही काही क्षणार्थ संपूर्ण बसणे घेतला महिला पुरुष चिंचाळात होते पण आम्ही हातभार होतो डोळ्यासमोर इतर प्रवासी जळताना पाहत होतो मी त्यांच्याकडे फोन मागत होतो पण कोणीही मोबाईल दिला नाही हे शूटिंग करण्यात बिझी होते माणूस किती कुर झाला आहे हे मला त्या क्षणी जाणवले. नंतर कसा बसा माला फोन मिळाला लगेच मी 112 वर फोन केला आणि त्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांनी कळाली अर्ध्या तासात चार-पाच अग्निशामक दलाचे बंब आग विझवण्यासाठी आले  पण आग इतकी भयानक होती एकदम पुरेसे नव्हते अजूनही गाड्या आल्यानंतर आज विझवता आली. .जळालेले मृत्यूदेह बसमधून बाहेर काढले तेव्हा काळजात चर्र झालं गेल्या सात वर्षापासून मी पोलिसात नोकरी करतो परंतु प्रथमच अशी घटना मी बघितली. असे गाडीत बसलेल्या पोलीस कर्मचारी यांनी सांगितले.. मागील चार महिन्यापूर्वी नाशिक मध्ये देखील असेच घटना घडली होती. या घटनेने मोठ्या प्रमाणात खळबळ झालेली आहे समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत सात महिन्यांमध्ये 449 अपघात झाले आहेत. आणि 95 बळी गेले आहेत त्यामुळे हा रस्ता दळणवळणासाठी उपयोगी झाला असता तरी मुत्याची वाट दाखवणार आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अपघात झाला भेट देऊन मृताच्या वारसांना पाच लाख रुपये मदत व जखमींच्या खर्च सरकारकडून करण्याची घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान पंचवीस प्रवाशांसाठी ही रात्र काली रात्र ठरले आहे. दरम्यान आता समृद्धी महामार्गावर प्रवास करायचा का नाही असा प्रश्न  प्रवाशांना पडला आहे. ही बस दरवाजाच्या

 

 

साईडने पडल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. वांहनधारकांनी मर्यादित वेगेतच वाहन चालवावे. अपघात घडला तेव्हा खिडकीच्या काचा फुटल्या असल्या तर प्रवासी वाचले असते. दरम्यान अजूनही प्रवाशांची मृत्यू देहाची ओळख पटत नसून सार्वजनिक अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेली आहे. घटनास्थळावर नागरिकांनी व नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरम्यान ड्रायव्हर शेख याला ताब्यात घेतले असून अटक करण्यात आले आहे. दरम्यान विदर्भ ट्रॅव्हलचे संचालक वीरेंद्र धरण यांनी हा अपघात टायर फुठून झाल्याचे म्हटले आहे. तर आरटीओ विभागातर्फे अपघातास कारणीभूत मानवी चूक असल्याचे बोलले  आहे. दरम्यान असे अपघात होऊ नये यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अपघातामध्ये शिरूरचे गंगावणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे मुलाचे ॲडमिशन घेऊन वापस येत असताना प्रिन्सिपल गंगावणे पत्नी व मुलगी सह मृत्युमुखी पडले आहेत. कौस्तुभ काळे हा पुण्याला नोकरीसाठी व मुलाखतीसाठी चालला होता मामी भाऊ त्याला घेण्यासाठी सकाळी धाब्यावर पोहोचला मात्र त्याची बस आली नाही तो एकुलता एक मुलगा होता. आई वडील वयस्कर.होते अपघातामध्ये तो देखील बळी पडला . घरची सर्व जबाबदारी त्याच्यावरती होती. सुशील दिनकर खेळकर 23 या तरुणाला मुंबईवरून नोकरीचा कॉल आला होता तो पुणे येथे एमबीएचे शिक्षण घेत असल्यामुळे उपयोगी कागदपत्रे घेण्यासाठी जात होता तर प्रथमेश खोडे तनिषा तायडे व तेजस्विनी राऊत यांनी शिक्षणासाठी जात होते कुणी मुलाखतीसाठी जात होते कुणी रुजू होण्यास निघाले होते पण काळा त्यांच्या मार्गावर होता अतिशय दुर्दैवी अशी घटना काल बुलढाणा जवळील पिंपळखुटा येथे घडली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे