क्रिडा व मनोरंजन

मुलींच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १५ वर्षांखालील ) रायगड व सांगली चे विजय

 

 

मुलींच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १५ वर्षांखालील )

रायगड व सांगली चे विजय

 

नाशिक जनमत   नाशिक मध्ये आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , झालेल्या पहिल्या सामन्यात रायगडने नाशिकवर ६ गडी राखून विजय मिळवला. नाशिकच्या सी गटात

रायगड ,सांगली व विजय हे इतर संघ आहेत. एक दिवसीय मर्यादित ३५ षटकांच्या स्वरूपात सदर स्पर्धा खेळवली जात आहे . हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने आठव्या क्रमांकावरील इव्हा भावसारच्या ४० चेंडूतील तडाखेबंद नाबाद ६२ धावांच्या जोरावर २८.१ षटकांत १७२ धावा केल्या . सलामीच्या प्रचीती भवरने २९ धावा केल्या. रोशनी पारधी, निशी विठलानी, वैभवी कुलकर्णी , समिधा तांडेल व आर्या गदडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले . विजयासाठी १७३ धावांचा पाठलाग करतांना रायगडची १० षटकांत ४ बाद ५४ अशी स्थिति झाली होती. पण सलामीच्या रोशनी पारधीने नाबाद जोरदार ११३ धावा करत ३१.३ षटकांत संघाला ६ गडी राखून विजयी केले. तिला आर्या पाटील – नाबाद २५ ची साथ मिळाली. सिद्धी पिंगळेनी २ तर प्रचीती भवर व जान्हवी बोडकेने प्रत्येकी १ गडी बाद केला.

 

तर महात्मानगर क्रिकेट मैदानावरील दुसर्‍या सांगली विरुद्ध विजय सामन्यात सांगलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेत ३५ षटकांत ५ बाद २१९ धावा केल्या . कर्णधार सह्याद्रि कदमने सर्वाधिक ८३ व सरस्वती कोकरेने नाबाद ५६ व रितू जमादारने २८ धावा केल्या. ओवी गजमलने ३ गडी बाद केले. उत्तरादाखल विजय संघ २३.३ षटकांत ९७ पर्यंतच मजल मारू शकला.

 

 

सरस्वती कोकरेने ३ , सह्याद्रि कदमने २ तर मीहिरा चिमन्ना , निधी तावडे व प्राजक्ता पवारने प्रत्येकी १ गडी बाद करत सांगलीला १२२ धावांनी विजयी केले.

 

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे