प्रहार जनशक्ती पक्षाच्य कार्यालयाचे दिंडोरी रोड येथे उद्घाटन.
नाशिक :
नामदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात ते आठ वर्षात दत्तू बोडके, रुपेश परदेशी यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. त्या कार्याला अधिक बळ मिळण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता होती. ती आज पूर्ण झाली असून या कार्यालयामुळे समाजातील गोरगरीब,अपंग, अंध यांचे प्रश्न मार्गी लागतील असेल प्रतिपादन व्ही. एन. नाईक. संस्थेचे माजी संचालक महेश आव्हाड यांनी केले.
दिंडोरी रॊड येथे म्हसोबा मंदिरासमोर बाजार समिती संकुलात प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार अपंग क्रांती संघटना जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनप्रसंगी आव्हाड बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे आरसीई एजुकेशनचे संचालक रवींद्र पाटील यांनीही शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रहारच्या वतीने जे सामाजिक कार्य सुरु आहे ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तू बोडके, संध्या जाधव, जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, रुपेश परदेशी, आदी उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमांनंतर पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, नगरसेवक जगदीश पाटील, शंकर हिरे, संजय टिळे पाटील, गणेश उन्हवणे, वास्तव दोंदे, छोटू वारुळे आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रहार संघटनेचे शहरअद्यक्ष शाम गोसावी, ललित पवार,समाधान बागल,बबलू मिर्झा, ऋषिकेश डापसे, ललित डगळे, भारती चौधरी, जेकब पिल्ले, बच्चू निकाळजे, रोहित नायडू, सनि मगर, विनोद डेंगळे, सचिन पगारे, किरण गांगुर्डे, प्रेम परदेशी, जयेश चव्हाण, बाळू सांगळे, पंकज सूर्यवंशी, रवींद्र टिळे , विनायक कस्तुरे, सागर सूर्यवंशी, प्रमोद केदारे आदी उपस्थित होते