भर दिवसा बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. जय भवानी रोडला नागरिक दहशतीखाली. वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी.
नाशिक जनमत. जय भवानी रोडच्या कदम डेअरी भागात काल भर दिवसा दुपारी चार वाजेच्या दरम्यान एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्यास ठार केल्याचे दृश्य दिसले. दरम्यान बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. जय भवानी रोडच्या परिसरातील पाटोळे मळा या भागात तीन ते चार दिवसापासून या बिबट्याचा संचार सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झालेला आहे. अनेक नागरिकांना बिबट्याचा वावर दिसल्याने भीतीचे वातावरण झाले आहे. बिबट्याने शनिवारी एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले .ही घटना लहान मुलाने पाहिली आणि पालकांना सांगितले.
संग्रहित छायाचित्र.
पालकाने व स्थानिक नागरिकांनी तातडीने वन विभागाला फोनवरून ही माहिती दिली .परंतु वन विभागाने कुठलीही तत्परता न दाखवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तातडीने या बिबट्याला जर बंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नाशिक शहराच्या आजूबाजूला व परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याचे दिसत आहे. चारच दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन पांडवलेणी डोंगरावर देखील दिसून आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला बंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.