मुंडे गावच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयत प्रभू नयन फाउंडेशन व श्री साई साहाय समितीच्यातर्फे शैक्षणिक विज्ञान साहित्याचे वाटप.
मुंढेगावच्या कस्तुरबा गांधी बालिका विध्यालयात प्रभू नयन फाउंडेशन व श्री साई सहाय्य समितीच्या वतीने शैक्षणिक, विज्ञान साहित्याचे वाटप
बेलगाव कुऱ्हे: लक्ष्मण सोनवणे
मुलींच्या वैज्ञानिक विकासासाठी अतिशय महागडे विज्ञान साहित्य शाळेला मिळाले. शिक्षण हे वाघिणीचे दुुध असून मुलींनी याचा फायदा घेऊन दर्जेदार यशस्वी शिक्षण घेऊन नाव उंचवावे असे आवाहन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले. आपणही समाजाचे काहीतरी देने लागतो या भावनेतून तालुक्यातील मुंढेगाव येथील कस्तृरबा गांधी बालिका विध्यालयात मुबई येथील प्रभू नयन फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष आनंद मवानी, दिपा मवानी, श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर इगतपुरी यांच्या संकुक्त विध्यमाने येथील बालिका शाळेत विज्ञान साहित्य तसेच शैक्षणीक साहित्य वाटप केले. यावेळी ते बोलत होते. श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर , श्रीमती सरिता कुडतरकर यांनी शाळेतील दोन निराधार मुलींना शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत दत्तक घेतले. यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, श्री साई सहायय समिती अध्यक्ष राजू देवळेकर, तहसील कार्यालयातील कर्मचारी परिघा उपासने, स्वप्नील अहिरे, पंकज पाटील, योगेश गोवर्धने, पत्रकार लक्ष्मण सोनवणे, शरद धोंगडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार कासुळे पुढे म्हणाले की, कस्तुरबा गांधी विध्यालयातील मुलींना मोफत शैक्षणिक विविध प्रकारचे दाखले तहसील कार्यातून लवकरच देणार आहोत.
- यावेळी मुख्याध्यापिका अस्मिता कट्यारे , सरिता पवार, वैशाली इंगळे, मंगल जाधव प्रतिभा सोनवणे, मदन भोये, श्री डावरे, गणेश शिंदे, स्वाती डावरे, विजय ढेपले, ललिता आवारी आदी उपस्थित होते