हरिश्चंद्रगडाच्या खोल दरीत आढळला तरुणाचा मृतदेह ,मृत छत्रपती संभाजीनगरचा, नातेवाईकांडून संशय. नाशिक व पुण्याचा रेस्क्यू टीमने देह खोलदरीतून काढला बाहेर.

हरिश्चंद्रगडाच्या खोल दरीत आढळला तरुणाचा मृतदेह
मृत छत्रपती संभाजीनगरचा; नातेवाइकांकडून संशय.
नाशिक जनमत चार दिवसापासून मित्राची मोटरसायकल शिर्डीला जातो म्हणून घेऊन गेलेला. ऋषिकेश जाधव हरिश्चंद्रगडेच्या कोकण कड्याच्या दरीमध्ये त्याचा मृतदेह मिळून आला आहे. पर्यटक स्थळ असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून सुमारे १६०० फूट दरीत ऋषिकेश बाळू जाधव (वय २१) या तरुणाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ऋषिकेशची हत्या, आत्महत्या की अपघात, याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तर नातेवाईकांनी मात्र या घटनेबद्दल संशय व्यक्त केल्याचे समजते.
छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त रहात होता. परंतु सोमवारी ऋषिकेशचा फोन न आल्यामुळे आई वडिलांनी त्याचा शोध घेतला. त्याचा शोध लागला नसल्यामुळे आडगाव पोलिस ठाण्यात ऋषिकेश जाधव बेपत्ता असल्याची खबर मंगळवारी (दि.११) रोजी दिली. त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो मित्राची मोटरसायकल घेऊन हरिचंद्र गडाकडे
गेला असल्याचे सांगितले. ऋषिकेशने त्याच्या लॅपटॉपमधून गुगलवर हरिश्चंद्रगड हे लोकेशन टाकले असल्याचे नातेवाईकांना त्या मित्राकडून समजले.
त्यामुळे नातेवाईकांनी मंगळवारी हरिश्चंद्र गडाकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे मोटरसायकल उभी केल्याचे दिसून आले. मंगळवारी दुपारी कोकण कड्याच्या १६०० फुट खोल दरीत दुर्बिणीतून मुतदेह दिसला. राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक
सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. बुधवारी डेला अॅडव्हेंचर, लोणावळा आणि नाशिक क्लाइम्बर्स अँड रेस्क्यूर्स असोसिएशन या दोन रेस्क्यू टीम पाचनई गावामध्ये रात्रीच्या दोन वाजता पोहचल्यावर पहाटे ४ वाजता हरिश्चंद्रगड गडावर पोहचले. पहाटेच्या
कोकणकडावरून रॅपलिंगने चार जणांची टीम अवघड खोल दरीत उतरली. रॅपलिंगने ऋषीकेशचा मृतदेह माथ्यावर आणण्यात आला. राजूर ग्रामीण रुग्णालयात ऋषिकेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यातआला.