शुभम पार्क परिसरात खून करणारे चौघे अटकेत; दुचाकी अडवून झाले होते फरार

शुभम पार्क परिसरात खून करणारे चौघे अटकेत; दुचाकी अडवून झाले होते फरार
डी. फार्मसीच्या सुमितचा मागील भांडणाची कुरापत काढत मित्रांनीच केला होता घात
सिडको : नासिक मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढले असून खुनाच्या घटनेमध्ये वाढ होत आहे होळीच्या दिवशी संध्याकाळी सातच्या दरम्यान फोन करून सुमित देवरे या युवकाला बोलून घेतले व जुन्या वादातून त्याचा खून झाल्याचा प्रकार घडला आहे. आरोपींना पोलिसांनी आठ तासात जेरबंद केले आहे यामध्ये दोन अल्पवयीन आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की शुभम पार्कच्या मुख्य
रस्त्यालगत गुरुवारी (दि.१३) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून चौघा संशयितांनी धारदार शस्त्राने वार करून डी. फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या सुमित सुनील देवरे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा निघृणपणे खून केला होता. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन विधी संघर्षित बालकांसह चौघा संशयितांना आठ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढण्यासाठी समोरून दुचाकीवर जात असलेल्या नैतिक ठाकूर यांस धारदार
आई म्हणाली नको जाऊ बाहेर…
सुमित देवरे हा घरात असताना त्याला महत्त्वाचे काम असल्याचे सांगून संशयित आरोपींनी शुभम पार्कजवळील चर्चजवळ येण्यास भाग पाडले. सुमितच्या आईने सुमित यास बाहेर जाऊ नको, असे सांगितले होते. मात्र, सुमित याने आईला मी लगेच जाऊन येतो असे समजावून सांगितले अन् सुमितची ही भेट त्याच्या आईसाठी अखेरची ठरली.
शस्त्राचा धाक दाखवून अडवून त्यांच्या ताब्यातील दुचाकी घेत धूम ठोकली होती.
मागील भांडणाची कुरापत काढून चौघा संशयित आरोपींनी सुमित यास धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले. यात सुमितचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर
वार झाल्याचे सुमितनेच वडिलांना कळविले
संशयित आरोपींनी सुमितवर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर त्याने वडिलांना फोन करून माझ्यावर वार झाल्याचे सांगितले. मात्र हा सुमितचा शेवटचा फोन ठरला. सुमित हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबियावर मोठा आघात झाला आहे.
कड तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे व गुन्हे शोध पथकाचे सुनील पवार व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. खून करून पसार झालेल्या संशयित आरोपींबाबत पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ संशयित अरुण उत्तम वैरागर (२०) तसेच प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे (१९, दोघे रा.अंबड) व दोन विधी संर्घषित बालक
अशा चौघांनाही आठ तासांतच ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत, किरण रौंदळे, दीपक बागुल, नितीन फुलपगारे, संदेश पाडवी, उमाकांत टिळेकर, राहुल जगझाप, मयूर पवार, स्वप्निल जुंद्रे, सागर जाधव, प्रवीण राठोड यांच्या पथकाने केली. पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत.