इंदिरानगर येथील फर्निचर चे दुकान जाळणाऱ्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू.

ज्र्नचर दुकान जाळले त्याचा उपचारादरम्यान मृत्यू
प्रतिनिधी नाशिक जन्मत प्रतिनिधी मोहीन मंनसूरी
नाशिकच्या इंदिरानगर भागामध्ये चार दिवसापूर्वी कौटुंबिक वादातून भावाने भावाचे फर्निचरच्या दुकानाला आग लावण्याची घटना घडली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या दुकानाचे देखील मोठे नुकसान झाले होते. दरम्यान ज्या भावाने आग लावली तोही या जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचे निधन झाल्याचे वृत्त आले आहे
दोन भावांच्या वादातून फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत पाठ भाजल्याने जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईनाका पोलिसात गृह आगळीकचा गुन्हा दाखल करण्यात आला असून. या घटनेत भाजलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मयत तरुणाविरोधातही दुकानाला आग लावल्याचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ४ मार्च रोजी दुपारी ४ वा. एफ. एच. फर्निचर, साईनाथ चौफुली, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे आगीची घटना घडली होती. यात नवीद रउफ मन्सुरी (३३) आगीत भाजल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर झाल्याने खासगी रुग्णालयात त्यास दाखल केले असता
नवीदने फर्निचर बनवण्याचे केमिकल दुकानात ओतून काडीपेटीने आग लावल्याने केमिकलचा भडका झाला व त्यात नवीद भाजला होता. पाठ व डोके भाजल्याने गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदान खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केले आहे.
उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आगीत फर्निचरचे दुकान, गॅरेज जळून खाक होऊन ५२ लाखांचे आर्थिक नुकसान झाले. अमु शेख यांच्या तक्रारीनुसार, अल्फाज मन्सुरी, रउफ मन्सुरी, नवीद मन्सुरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.