आदिवासी विकास अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडीस. विद्यार्थ्यांना दिले जाते निकृष्ट दर्जाचे अन्न. आयुक्तांची दुर्लक्ष.
हिरामण खोसकर यांनी केलेल्या पाहनी मध्ये झाले उघड.

” नाशिक जन्मत प्रतिनिधी आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ४४ आश्रमशाळांतील १८ हजार विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून चक्क सडलेला भाजीपाला, किड लागलेले कडधान्य खाण्यास दिले जात आहे. हे अन्न तयार करण्यासाठी नदीतून टँकरद्वारे आणलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी गुरुवारी (दि. ९) सकाळी अचानक टाकलेल्या छाप्यात ही सत्यता उघड झाली.
आश्रमशाळेतील मुलांसाठी शासनातर्फे करोड़ो
नाशिकमध्ये ४४ आश्रमशाळांत १८ हजार विद्यार्थ्यांना वर करोडो.
रुपये खर्च केले जातात. मात्र, त्यातील खर्च फक्त कागदोपत्रीच होत असल्याची बाब समोर आली. तालुक्यातील मुंडेगाव येथील सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे अन्न खाण्यास दिले जात आहे. खोसकर यांनी या ठिकाणी अचानक भेट दिल्यानंतर जनावरेही खाणार नाही अशा अन्नपदार्थांपासून जेवण तयार केल्याची बाब उघड झाली. आमदारांनी सेंट्रल किचनमध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय अस्वच्छ जागेवर अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे दिसून आले. टाकीतील हरभरा, वाटाणा व चवळी ही कडधान्ये किडलेली, बुरशीयुक्त असल्याचे समोर आले आहे.
कोट्यावधी रुपयाची बिले आदिवासी विकास आश्रम शाळा वर विद्यार्थ्यांवर खर्चाची काढली जातात. यामध्ये प्रत्यक्ष केलेला खर्च. व दाखवलेला खर्च. हा खूप मोठा असतो. ठेकेदार व अधिकारी यांच्या मिली भागातून बिले पास करण्यात येतात. आदिवासी आयुक्त नयनाताई गुड यांचे दुर्लक्ष आहे. आश्रम शाळेत दर हप्त्यामध्ये अधिकाऱ्यांनी तपासणी केली पाहिजे. एसी मध्ये बसून पगार घेत असतात.
खराब झालेले टमाटे. दोन दिवस अगोदरच कापलेली.
या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात किडे आढळून आले. किड्यांनी पोखरलेली ही कडधान्ये विद्यार्थ्यांना खायला दिली जात आहेत. तांदळाचा दर्जादेखील चांगला नाही. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चपात्याही एका
रात्री दहापर्यंत उपाशी असलेली मुले.
बाजूने कच्च्याच असल्याचे दिसून आले. त्यामुळे सेंट्रल किचनचे अधीक्षक महेंद्र सपकाळ व कैलास चव्हाण यांच्यासह तेथील कर्मचाऱ्यांची आमदारांनी खरडपट्टी काढली. सेंट्रल किचनपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरापर्यंत आश्रमशाळेतील मुलांना जेवण पोहोचवले जाते.
: अन्नपूर्णा सेंट्रल किचनमध्ये दोन दिवसांपूर्वीच टोमॅटो कापून ठेवलेले दिसून आले. गेल्या बारा महिन्यांपासून टेस्टिंग लॅबही बंद आहे. बटाटेदेखील सडलेले बघून संतप्त झालेल्या आमदारांनी तेथील अधीक्षकांपासून कर्मचाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. एका कंत्राटी
किचनमध्ये कचऱ्यामुळे दुर्गंधी आ
, अन्नपूर्णा सेंट्रल किचन
कर्मचाऱ्याने या प्रकरणास वाचा फोडली.
तक्रार करावी तर कुणाकडे ? : इगतपुरी तालुक्यातून अन्नपूर्णा सेंट्रल किचनकडून आम्हाला दिला जाणारा पोषण आहार अत्यंत बेचव आणि निकृष्ट दर्जाचा असतो. मात्र तक्रार नेमकी करावी कुणाकडे असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहतो, अशी प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वर आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याने व्यक्त केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असेल मागणी आदिवासी भागातील नागरिकांनी केले आहे.. अन्नधान्य बरोबरच विद्यार्थ्यांच्या पोशाख ड्रेस खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचे बोलले जात आहे.
लकी जाधव यांनी आदिवासी विकास भवनाच्या कारभाराविषयी संशय व्यक्त केला. जनावरे खाणार नाही असे अन्न विद्यार्थ्यांना दिले जाते. सरकारने या अधिकाऱ्यांवर क** कारवाई करावी अशी मागणी.