चाकूचा धाक दाखवून मोहदरी घाटात एका महिलेस. लूटले.

- चाकूचा धाक दाखवून मोहदरी घाटात लुटले
नासिक वरून सिन्नर ला जाण्यासाठी निघालेली महिला बसली होती यावेळेस तिला मोहनदरी घाटामध्ये मारहाण करण्यात आली तिच्याजवळच्या बारा हजार रुपयाची लूट करण्यात आली. पोलिसांच्या सतरतेमुळे गुन्हेगारांना ताबडतोब अटक करण्यात आली
पिकअपमध्ये बसलेल्या महिलेला मोहदरी घाटात मारहाण करण्याबरोबरच चाकूचा धाक दाखवून १२ हजार रुपये किमतीच्या दागिण्यांची लूट करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी १२ तासात ताब्यात घेतले. तळेगाव दिघे (संगमनेर) येथील अलका गुंजाळ ही महिला नांदूरशिंगोटे येथे जाण्यासाठी पिकअप (एम.एच.१५, जे.सी. ८७७१) मध्ये बसली. मोहदरी घाटात तिला चाकूचा धाक दाखवून व मारहाण करीत दोन ग्रॅमचे टॉप्स, चांदीच्या पट्ट्या, मोबील, तीन हजार रुपये रोख असा १२ हजाराचा ऐवज लुटला होता. अरुण जगंल पवार (२३, रा. मापारवाडी), रोहीत मधुकर लहाने (२४, रा. सोनगिरी, दोघे ता. सिन्नर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.