बिजापूरचे पत्रकार चंद्राकार यांची हत्या. डोक्यात 15 ठिकाणी फॅक्चर. पाच हाडे मोडली मोडली आरोपींना फाशी द्या. पत्रकारांची मागणी.
बिजापूरचे पत्रकार चंद्राकार यांची हत्या
नाशिक जन्मत पाच महिन्यापूर्वी बनवलेला रस्ता खराब झाला. ही बातमी त्याने प्रसिद्ध केली. आणि तपास चालू झाला. हेच कारण ठरले आणि त्याला ठेकेदाराने निरगुडपणे त्याचा खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी. त्याला पाण्याच्या पाण्याचा टॅगमध्ये पॅक करून वरून सिमेंटचे पॅक केला. मोबाईल गायब केला . पण पाप केलेला हा गुन्हा उजेडात आला. 3 जानेवारी रोजी ही घटना घडली. पत्रकारांमध्ये या घटने बद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.. मध्ये तो पत्रकार होता हाच त्याचा पहिला गुन्हा होता. तो त्याचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत होता, हा त्याचा दुसरा मोठा गुन्हा होता. पण निर्दयपणे त्याचा जीव घ्यावा एवढा मोठा गुन्हा होता का हा? तर नक्कीच नाही. पण असं झालं आहे की, छत्तीसगड मधील बिजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकार यांची काल अत्यंत अमानुषपणे, अगदी आपल्या मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख पध्दतीनं हत्या केली गेली.
बातमी हे कारण असले तरी बातमी देणं हेच तर मुकेशचं काम होतं. भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणं, अन्यायाच्या विरोधात आवाज देणं मुकेशचं कर्तव्य होतं. तो हेच तर करीत होता. एका महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं, त्यात मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्यामुळं तो रस्ता चार महिन्यात फुटला होता. त्याची बातमी मुकेशनं दिली. किती गंभीर गुन्हा होता हा नाही का? बातमीची छत्तीसगड सरकारनं दखल घेतली, चौकशी सुरू झाली. त्यामुळे ठेकेदाराचे हितसंबंध दुखावले. चवताळलेल्या गुत्तेदारानं मग त्याला माझी बाजूही दाखवा असं सांगून घरी बोलावलं. गुत्तेदाराच्या गुंडांनी मग त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
तीक्ष्ण हत्याराने त्याच्या मानेवर, डोक्यावर, छातीवर वार केले गेले. त्यात मुकेश ठार झाले. मग त्यांचा मृतदेह घरातील सेप्टीक टँकमध्ये टाकला गेला. त्यावर सिमेंटचे मोठे झाकण ठेवले गेले. दोन दिवस मुकेशचा पत्ता नाही म्हटल्यावर शोधाशोध सुरू झाली. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन गुत्तेदाराच्या घरातले दाखवत होते. अखेर मकेशचा मतदेह गत्तेदाराच्या
घरातील सेप्टीक टँकमध्ये मिळाला.
ही बातमी बस्तर, बिजापूर ते सुकमा या दंडकारण्य परिसरात पोहोचली. पत्रकार रस्त्यावर आले.
माध्यम जगतात मोठा संताप निर्माण झाला. मुकेश चंद्राकार हा एनडीटीव्हीसाठी काम करायचा. त्या अगोदर त्यानं इटीव्ही, न्यूज १८ छत्तीसगडसाठी काम केलं होतं. “बस्तर जक्शन” नावाचं स्वतःचं युट्यूब चॅनल तो चालवायचा.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुकेशनं शिक्षण घेतलं होतं. कधी आश्रमशाळेत तर कधी वसतीगृहात राहून त्यानं शिक्षण पूर्ण केलं. हलाखीचं आयुष्य वाट्याला आल्यानं गरिबी, गरिबांच्या व्यथा, आदिवासींचे प्रश्न मुकेशला ज्ञात होते. त्या प्रश्नांबद्दल त्यांना तळमळ होती. संघर्षशील आयुष्य वाट्याला आल्यानं एक बेडरपणा स्वभावात आला होता. त्यामुळे माओवाद्यांच्या कॅम्पमध्ये घुसून ते कॅम्प आपल्या युट्यूब दाखविण्याची हिंमत मुकेश करू शकत होता.
मुकेशला लोकमान्यता मिळाली
होती. दुसरीकडं त्याचे शत्रूही निर्माण झाले होते. अखेर शत्रूनी डाव साधला आणि एका लोकप्रिय, सामान्यांसाठी लढणा-या पत्रकाराचा आवाज कायमचा बंद केला गेला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. छत्तीसगड सरकारने या हत्याकांडाची गंभीर दखल घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने देखील या घटनेची दखल घेऊन देशभर पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. गडचिरोली येथील पत्रकार महेश तिवारी व एस. एम. देशमुख यांनी या प्रकरणी आवाज उठवायला सुरूवात केली आहे.
-छत्तीसगडमधील विजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर याला एसआयटीने हैदराबाद येथून अटक केलीय. सुरेश चंद्राकर हे व्यवसायाने कंत्राटदार असून, ते काँग्रेसचे सदस्यही आहेत. मुकेश चंद्राकर आणि सुरेश चंद्राकर हे नातेवाईक आहेत. मुकेश चंद्राकर यांनी भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले होते त्यानंतर सुरेशने त्यांची हत्या केली होती. हे प्रकरण 3 जानेवारी रोजी उघडकीस आले., तेव्हापासून पोलीस सुरेश चंद्राकरचा शोध घेत होते. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, मुकेशच्या यकृतावर खोल जखम झाल्याचं आढळलंय. 5 हाडं तुटली, डोक्यात 15 फ्रॅक्चर, हृदय फुटलेलं अन् मान तुटलेली आढळली होती. 12 वर्षाच्या कारकिर्दीत असे हत्याकांड कधीच पाहिले नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय.
एसआयटी हैदराबादला गेली होती :या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. आरोपीला पकडण्यासाठी एसआयटीचे पथक हैदराबादला रवाना झाले होते. तेथे रविवारी रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली. सुरेशचा भाऊू रितेश चंद्राकर आणि दिनेश चंद्राकर यांच्यासह एका सुपरवायझरला यापूर्वीच अटक करण्यात आलीय. 33 वर्षीय मुकेश चंद्राकर हे फ्रीलान्स करणारे पत्रकार होते. 1 जानेवारी रोजी ते बेपत्ता झाले होते. 3 जानेवारी रोजी मुकेश यांचा मृतदेह विजापूर शाहरातील छतनपारा बस्तीमधील सुरेश चंद्राकर याच्या मालकीच्या मालमत्तेत असलेल्या सेप्टिक टँकमधून सापडला होता. सुरेशवरही खुनाचा आरोप होता.
आरोपी ड्रायव्हरच्या घरात लपला होता :.