शिव पाणंद रस्त्यांसाठी चाळीसगाव तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन
शिव पाणंद रस्त्यांसाठी चाळीसगाव तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन
प्रतिनिधी नाशिक जनमत
वर्षानुवर्षे शेत रस्त्यांसाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळीमार्फत आंदोलन केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनीही तहसीलदारांना निवेदन देत शेतरस्ते तयार करुन देण्याची मागणी केली.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतरस्ते तयार करुन द्यावे अशी मागणी यावेळी चाळीसगाव तालुका शिवपाणंद शेतरस्ता चळवळीतील पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. दरम्यान तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक काढून ग्राम शेतर स्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देणार असल्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
चोपडा तालुक्यातही शेतकऱ्यांनी केली मागणी
चोपडा। शिव पाणंद रस्त्यांसाठी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळीच्या निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील यांना निवेदन दिले. यावेळी प्रज्वल पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, वासुदेव महाजन, प्रदीप पाटील यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतरस्ते व पाणंद रस्ते तातडीने मोकळे करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार पाटील यांनी शेतकऱ्यांना निवेदनाबाबत आश्वासन देत लवकरच या पाणंद रस्त्यांना मोकळे करण्यासाठी प्रशासनातर्फ प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्याने शेतकऱ्यांनीही तहसीलदारांचे कौतुक केले. यावेळी गणेश बाविस्कर, विनोद आव्हाड, हिलाल महाजन, वाल्मिक महाजन, प्रताप धात्रक यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. शिवपाणंद शेतरस्ता चळवळीतील पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. दरम्यान तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासाठी
परिपत्रक काढून ग्राम शेतर स्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देणार असल्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितले. तर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्याने शेतकऱ्यांनीही तहसीलदारांचे कौतुक केले. यावेळी गणेश बाविस्कर, विनोद आव्हाड, हिलाल महाजन, वाल्मिक महाजन, प्रताप धात्रक यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.