ब्रेकिंग
गंगापूर मुकणे पंपिंग स्टेशनवर दुरुस्ती. शनिवारी पाणी नाही.
नाशिक जनमत गंगापूर धरणात जरी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असला तरी कामाच्या निमित्ताने नाशिक शहरांमध्ये पाणीपुरवठा वीसकळीत झालेला आहे. मुकणे आणि गंगापूर धरणावरील महानगरपालिकेच्या पपिग टेशन मध्ये कामानिमित्त येणाऱ्या शनिवारी काम चालू र्णार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तसेच रविवारी कमी दाबाने सकाळचा पाणीपुरवठा होणार आहे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी बरोबरच महावितरणाशी संबंधित रोहित उपकेंद्राची अवस्था नाजूक आहे त्यामुळे विस्कळीत पाणीपुरवठा होत असून त्याचा फटका महिन्यातून किमान दोन-तीन वेळा नाशिककरणा बसत आहे दरम्यान मुकने धरणावरील पंपिंग स्टेशनच्या जॅक वेल साठी महावितरण कंपनीच्या गोंदे येथील रेमंड सब स्टेशन मधील एक्सप्रेस फीड वरून वीज पुरवठा केला जातो या सब स्टेशन मधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत पंपिंग स्टेशन चा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे त्याचबरोबर गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशन मधील दुरुस्तीची कामे देखील याचवेळी हाती घेतली जाणार असल्याने शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे व काळजी घ्यावी
⇔