आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
विभागीय आयुक्त कार्यालयात राजीव गांधी यांना अभिवादन.
दि. 18 ऑगस्ट, 2022
*विभागीय आयुक्त कार्यालयात राजीव गांधी यांना अभिवादन*
*नाशिक दि. 18 ऑगस्ट, 2022 (विमाका वृत्तसेवा):*
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी सद्भावना दिवसाची शपथही घेण्यात आली.
यावेळी उपायुक्त (पुनर्वसन) उमेश महाजन, नगरपालिका प्रशासनाचे सहसंचालक संजय दुसाने , उपायुक्त (नियोजन) प्रदीप पोतदार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.