नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास रिटपिटीशन दाखल करणार आ. सुहास कांदे
नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास रिटपिटीशन दाखल करणार आ. सुहास कांदे
नाशिक जनमत प्रतिनिधी अरुण हिंगमिरे याच्या कडून. नांदगाव तालुक्यात समज गैरसमज पसरविले जात आहे, तालुका दुष्काळ जाहीर झाला नाही.दुष्काळाचा क्राईट भाग आपण बघितला आहे.नांदगांव तालुका दुष्काळजन्य परिस्थितीत आहे असे असताना तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी वेळ पडल्यास आपण कोर्टात कृषीविभाग आणि राज्यशासनाच्या विरोधात रिट पिटिशन दाखल करु असा तथा( शासनाला घरचा आहेर असा) आमदार सुहास कांदे यांनी येथील शिवनेरी शासकीय सभागृहात दिला. तालुका दुष्काळ आढावा बैठकीचे आयोजन दि १८ रोजी करण्यात आले होते, यावेळी पञकार परिषदेत आ.कांदे यांनी निर्वानीचा इशारा दिला.
या प्रसंगी तहसीलदार डाॅ सिध्दार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी,तालुकाकृषी अधिकारी डमाळे आदीसह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या प्रसंगी तालुक्यातील पिक आनेवारी, पाऊस व पेरणी या विषयावर सखोल माहिती देण्यात आली या वरुन नांदगांव तालुका दुष्काळाच्या क्राईट एरीयात बसतो आहे .नांदगांव तालुक्यात ८ महसूल मंडळात ५०% जास्त असेल तर सर्व्हेक्षन करावा लागते, तालुक्यातील १०% उत्पादकता आढळली ति जिल्हाधिकारी यांना दिली आहे नांदगांव तालुक्यात ऑगस्ट मध्ये सर्वात कमी पाऊस झाला. जुन ते सप्टेंबर मध्ये पाऊस कमी झाला तालुक्यतील जलसाठ्यात मृतसाठ्याहुन पाणी अधिक कमी झाले आहे .
जलसाठ्यात पाणी नाही गावे वाडी वस्ती वर टँकरचे प्रमाण वाढत गेले टँकरशिवाय आता दुसरा पर्याय नाही. टँकर हा पाणी पुरवठ्याचा मुळ स्त्रोत आहे .
आपण शासनाला सर्व घटना क्रम दाखल केला तरी देखील तालुका दुष्काळ जाहीर केला नाही तर आपण शासनाविरोधात कोर्टात रिपिटेशन दाखल करुन शिवाय वेळ पडल्यास आमदारकीच्या पदाचा राजीनामा देईल असे जाहीपणे आमदार कांदे यांनी आपली भुमिका व्यक्त केली. जिल्ह्यात पालक मंञी दादासाहेब भुसे व वरिष्ठ मंञी छगन भुजबळ यांना झुकता माप दिले गेले. त्यामुळे येवला, मालेगांव, सिन्नर हि तालुके दुष्काळाच्या पहल्या यादीत घेतली गेली आहेत दुसर्या यादीत नांदगांव तालुक्याचा समावेश होईल अशी आशा तालुका बाळगून आहे तसेच परतीचा पाऊस जर आला तर चारा पाण्याचा प्रश्न सुटेल? नांदगांव तालुका दुष्काळाच्या द्रुष्टीतुन
पेरणी,प्लँनटेशन ट्रिगर वन मध्ये वसतो का? तालुक्यातील दोन पावसातील अंतर किती आहे. तालुक्यात सरासरी ६४:३ % पाऊस झालेला आहे, त्यामुळे झालेला पाऊस पेरणी होऊन पिकांच्या वाढीला पोषक ठरला नाही, त्यामुळे चार्यांची व पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली आहे .तालुका दुष्काळजन्य परिस्थितीत असताना जर तालुक्याकडे राज्याच्या कृषीविभागाने नांदगांव तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यास
आपण न्यायालयात रिटपिटिशन दाखल करु वेळ पडल्यास पदाचा राजीनामा देऊ असे आमदार सुहासअण्णा कांदे म्हणाले याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बंडू पाटील माजी सभापती तेज कवडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार तसेच तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.