सौ. कांदे यांच्या हस्ते गिरणानगर आदिवासी वस्तीवर सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न.

सौ. कांदे यांच्या हस्ते गिरणानगर आदिवासी वस्तीवर सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न.
नाशिक जनमत. प्रतिनिधी. अरुण हिग् मिरे गिरणानगर ता.नांदगाव येथील आदिवासी वस्तीवरील (वडाळकर वाडा) महिला व नागरिकांना या आधी दिलेल्या भेटीत स्थानिकांनी विविध विकास कामांची मागणी केली होती.सौ.अंजुम ताई कांदे यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांना माहिती दिली असता तात्काळ दाखल घेत कामांना मंजुरी दिली.
आज या कामांचे भूमिपूजन या वेळी करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना आपल्या समस्या सोडवणे हे आमचं कर्तव्य आहे, आपण निसंकोपणे आमच्याशी संपर्क करू शकता असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला.
या मध्ये मूलभूत सुविधा योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय तसेच सभामंडप बांधण्यात येत आहे.
या प्रसंगी सौ.रोहिणी मोरे, भारती ताई बागोरे, सरपंच अनिता पवार, पल्लवी सोमासे,विद्या कसबे, संध्या पवार, निराली वाघ, रेणुका बाहिकर,नम्रता सांबरे, राधा सांबरे, वैशाली पडवळ, राहुल पवार, अनिल , राजेंद्र कुटे आदींसह नागरिक उपस्थित होते.