नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*
*नाशिक येथे 20 ऑक्टोबरला नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा*
*नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*
*नाशिक, दिनांक 18 ऑक्टोबर, 2023 नाशिक जनमत वृत्तसेवा):*
नवरात्रीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील 10 ठिकाणी नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देण्यासाठी शुक्रवार, दिनांक 20 ऑक्टोबर, 2023 रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून, या कार्यक्रमाचे विकास खारगे, मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन होत आहे.
दिनांक 18 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत महाराष्ट्राच्या 6 महसुली विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी (मुंबई, पुणे, नाशिक, छ.संभाजीनगर, अमरावती व नागूपर ) तसेच साडेतीन शक्तीपिठांच्या ठिकाणी (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, वणी ) नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणाऱ्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 20 ऑक्टोबर, 2023 रोजी महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार सर्वश्री नरेंद्र दराडे, किशोर दराडे, डॉ. सत्यजित तांबे, दिलीप बनकर, माणिक कोकाटे, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, राहुल आहेर, दिलीप बोरसे,
राहुल ढिकले, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज अहिरे, नितिन पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल हे निमंत्रित आहेत.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणाऱ्या समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.