ब्रेकिंग

बॅक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित व महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमाफॅत मोफत एक महीन्याचे मेन्स पालॅर प्रशिक्षण समारोप आनदी वातावरणात.

  1. बॅक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित व महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमाफॅत मोफत एक महीन्याचे मेन्स पालॅर प्रशिक्षण देण्यात आले दि 1 ऑगस्ट पासून सदर प्रशिक्षण सूरू झाले होते, सदर प्रशिक्षण कार्यक्रम चा निरोप समारंभ दि 30 ऑगस्ट रोजी संपन्न झाला सदर कार्यक्रम साठी प्रमुख पाहूणे म्हणून ईश्वर निकम, पंडित सर,ज्ञानेश्वर कदम,नाशिक जनमत चे संचालक चंद्रकात धात्रक तसेच कार्यक्रम चे अध्यक्ष बी बी लवटे सर,LDM, नाशिक ,होते आर-सेटी प्रशिक्षण संस्थेचे संचालक गणेश सरोदे सर यानी

 

 

 

प्रास्ताविक भाषण केले तर पाहुण्याचा परिचय आर-सेटी प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक राजेंद्र पवार, यानी केले, तर आभार प्रदर्शन प्रशिक्षक समीर कूलकणीॅ, व सूत्रसंचालन विशाल गायकवाड यानी केले, सदर प्रशिक्षणात नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 45 युवकांनी सहभाग घेतला होता या एक महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना मेन्स पार्लरचे तंत्रशुद्ध व नवीन पिढीसाठी लागणारे असे मेन्स पार्लरचे शिक्षण देण्यात आले त्याच प्रकारे एक रुपया खर्च न करता संपूर्ण महिनाभर विद्यार्थ्यांना नाष्टा पाणी सकाळी. तर दुपारी जेवण रात्री जेवण व सर्व सुख सोयी पुरवण्यात आल्या. त्याचबरोबर सकाळी उठल्याबरोबर योगा प्राणायाम याचे शिक्षण देखील देण्यात आले एकूणच एक महिन्यांमध्ये या 45 विद्यार्थ्यांचा एक परिवार होऊन गेला होता आज समारोप असल्याने एक प्रकारे आपल्या गावी आपल्या आई-वडिलांकडे परिवाराकडे जाणार असल्याचा आनंद होता तर एक महिन्यापासून ओळख नसलेले सर्वजण मित्र होऊन एक परिवार झाले होते त्याचे दुःख देखील चेहऱ्यावर होते. आणि या ठिकाणी मेन्स पार्लरच्या प्रशिक्षणाबरोबरच टेलरिंग प्रशिक्षण बकरी पालन ब्युटी पार्लर इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांना त्याचबरोबर कसे राहावे व आपल्या परिवार व प्रगतीकडे लक्ष केंद्रित करावे धार्मिक व सर्व रूढी परंपरेप्रमाणे आदर्श युवक होण्यासाठी प्रशिक्षण देखील दिले जाते. कार्यक्रम समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चंद्रकांत धात्रक यांना आमंत्रित केले होते. यावेळी धात्रक यांनी विद्यार्थ्यांना आशावादी आनदी. संयम नम्रता चिकाटी आणि तोंडात साखर ठेवल्यास यश नक्कीच आपल्या हातात आहे. हिम्मत ही महत्त्वाची आहे आपल्या परिवाराकडे देखील आई-वडिलांकडे लक्ष द्यावे त्यांचा संभाळ करावा असे आपल्या मार्गदर्शनामध्ये अनेक उदाहरणे देऊन सांगितले. महाराष्ट्र महा बँक ग्रामीण भागातील युवकांना स्वयम रोजगार विषयी मार्गदर्शन. तसेच प्रशिक्षण देखील देते तसेच व्यवसायासाठी लागणारा पैसा देखील म्हणजेच भांडवल लोणंद्वारे विद्यार्थ्यांना देत असते खूप आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांनी या क्लासेस लाभ घ्यावा असे सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे