ब्रेकिंग

बिसलरी च्या नावाखाली जनतेचे सरस केली जाते गिराईकाची लूट.

नाशिक  जनमत प्रतिनिधी   बिसलरी पाणी बाटली च्या नावाखाली विविध नाव बदलून राज्यामध्ये व इतर राज्यांमध्ये देखील जनतेची सरासपणे लूट चालवलेली आहे अशा पाणी बॉटल व पाणी विकणाऱ्या कंपन्या व त्यांच्या मालकांवर सरकार का कारवाई करत नाही. आरोग्याचा प्रश्न असला तरी सरकार आंधळे झाल्या सारखे करत आहे.  का. जनतेच्या आरोग्याची सरासपणे हा खेळ चालू आहे. बिसलरी पाण्याच्या नावाखाली  अशाप्रकारे जनतेला लुटण्याचा प्रकार आहे. रेल्वेमध्ये तर हे पाणी सरास वीस ते पंचवीस रुपये बाटली प्रमाणे विकल्या जाते .तर अनेक पाणी विक्रेते देखील विविध या पाण्याच्या बाटल्या विकताना दिसत आहे. नाशिक शहरात देखील असा प्रकार सरास  चालू आहे यावर अन्न औषध प्रशासन काय करतं हे कळत नाही. आर्थिक व्यवहाराचं संशय या ठिकाणी बिकट होत असल्याचे चित्र आहे. बिसलरी व नाव बदलून टाकलेल्या बाटल्यांच्या मधले स्पेलिंग नागरिकांना घाई व विलाज नसल्याने सरास बिसलेरी च्या नावाखाली पैसे देऊन बाटल्या खरेदी करतात. नंतर फसवणूक झाल्याचे कळते. दरम्यान वीस रुपयांच्या बाटलीसाठी नागरिक पुढे न येता तक्रार देखील करत नाही. दरम्यान सरकारने अशा पाणी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी व जनतेची लूट थांबावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. होलसेल मध्ये 70 रुपये डझन प्रमाणे मिळणाऱ्या बाटल्या 20 प्रमाणे विकल्यास 240 रुपये अडीच पट नागरिकांच्या आरोग्याला खेळून हा नफा कमवता. बिसलेरीच्या पाण्याची तुलना व या बाकीच्या पाण्याच्या बाटल्या चया पाण्यामध्ये  खूप फरक दिसून येतो. कृपया लवकरात लवकर कारवाई करून जनतेची लूट व आरोग्याचा खेळ थांबवा.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे