मागासावर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू* *20 सप्टेंबर पर्यंत करावेत अर्ज
*मागासावर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू*
*20 सप्टेंबर पर्यंत करावेत अर्ज*
*नाशिक, दिनांक 12 सप्टेंबर 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा):*
समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थींनींकरीता असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थीनींनी 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, युनिट क्रमांक 4 नाशिक चे गृहप्रमुख यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह युनिट क्रमांक 4 जुने नाशिक, 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह के.के.वाघ कॉलेजच्या मागे नाशिक आणि मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह (जुने) नाशिक आणि गुणवंत मुलींचे
शासकीय वसतिगृह (नविन) नाशिक या चार ठिकाणी शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत. वसतिगृह प्रवेशासाठी मुलींनी ऑफलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. प्रवेशासाठी पालकांचा
उत्पन्न दाखला आवश्यक असून एन.टी, ओ.बी.सी, एस.बी.सी प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा 1 लाख 50 हजार इतकी तर एस.सी, एस.टी साठी उत्पन्न मर्यादा 2 लाख 50 हजार इतकी आहे. अर्जासोबत सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, मागील वर्षाची गुणपत्रिका, महाविद्यालयाचा बोनाफाईड दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, विद्यार्थींनीचे आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. वसतिगृह प्रवेश अर्ज विनामुल्य स्वरूपात कार्यालयान वेळेत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जुने नाशिक, नासर्डी पुलाजवळ, समाज कल्याण कार्यालय, नाशिक 422011 येथे विनामुल्य उपलब्ध आहेत.
वसतिगृहात विनामुल्य निवास व्यवस्था, बिछाना साहित्य, संगणक सुविधा, अभ्यासिका, ग्रंथालय-दूरदर्शन सुविधा, व्यायमाची साधने, प्रतिमाह निर्वाह व प्रसा. साहित्य भत्ता विभागीयस्त्र रूपये 900 दिला जातो, शैक्षणिक साहित्याकरीता प्रतिवर्षी रूपये 4 हजार, शैक्षणिक सहलीसाठी प्रतिवर्षी रूपये 2 हजार, महाविद्यालयीन गणवेशाकरीता प्रतिवर्षी रूपये 2 हजार, वैद्यकीय अभ्यासाकरीता रूपये 500 (ॲप्रनसाठी), अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी बॉयलरसुटसाठी रूपये 500, कार्यशाळेसाठी रूपये 500, विनामुल्य नास्ता, दुपारचे व रात्रीचे भोजन, आठवड्यातून दोन वेळेस मांसाहारी जेवण अशा सुविधा वसतिगृहात विद्यार्थींनींना देण्यात येतात. असेही गृहप्रमुख यांनी कळविले आहे