ढकाबे गावाजवळ दुचाकी व चार चाकी चाअपघात .अपघातामध्ये पाच जण ठार.
नाशिक जनमत दिंडोरी रोडवर बोलेरो कार व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातामध्ये पाच जण ठार झालेले आहेत व तीन जण जखमी झाले आहेत सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन येत असताना ठाकांबे गावाजवळच्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला दुचाकी वरील बापलेक शिंपी टाकळी येथील असल्याचे कळते. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आज दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान घडली. बेलरो गाडीतील तीन जण ठार झाले असून तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .आंबुलस उशिरा
पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. ढकंबे गावातील समाजसेवक व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. दरम्यान चार चाकी वाहन व दोन चाकि एका झाडवर आदळले. यावेळी टायर देखील फुटल्याचे प्रत्यय दर्शन सांगत होते हा अपघात इतका मोठा होता की मोठा आवाज आला आजूबाजूचे नागरिक ताबडतोब मदत करण्यास धावले. परंतु जखमींना घेण्यासाठी ॲम्बुलन्स उशिरा आल्याने प्राण हानी झाली. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.