मुंबई पोलीस दलातील रिटायर ट्राफिक हवालदार साहेबराव सोनू सांगळे यांचे अपघाती निधन.

नाशिक जनमत प्रतिनिधी . आज सकाळी 11 ते सव्वा अकरा च्या दरम्यान मुंबईपोलीस दलातील दोन महिन्यापूर्वी रिटायर झालेले एपीआय साहेबराव सोनू सांगळे यांचे अपघाती निधन झाले. डीजीपी नगर 2 येथील केवल पार्क रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका वेल्डिंग शॉपसमोर च्या दुचाकी व चार चाकी चां हा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचे निधन झाले.
डीजीपी नगर दोन अंबड येथे ते दोन महिन्यापूर्वी नाशिकला मुंबईवरून वास्तव्यासाठी आले होते याच ठिकाणी त्यांनी दोन महिन्यांपूर्वी एका अपार्टमेंट मध्ये रूम भाड्याने घेतला होता. व डी जे प नगर दोन मधील सोनल डेअरी च्यावर नारायणी आपारमेंट फ्लॅट विकत घेतला होता चार-पाच दिवसात ते पूजा करून त्या ठिकाणी राहण्यास जाणार होते. मालेगाव येथील काटे जेऊर येथील ते रहिवासी होते 32 वर्ष त्यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ट्रॅफिक हवालदार पोलीस कॉन्स्टेबल एपीआय पर्यंत पोलीस दलामध्ये सेवा बजावली आज सकाळी देखील ते डी जे पी नगर दोन अंबड येथील स्वामी समर्थ केंद्रात स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आपल्या स्कुटीवर वापस येत असताना एका नवीन घेतलेल्या इको गाडी ने त्यांना उडविले या गाडीचा ड्रायव्हर शिकवू असल्याचे सांगण्यात येत आहे
. प्रत्येक दर्शनींनी सांगितले की ड्रायव्हर हा ज्येष्ठ नागरिक होता ब्रेकवर पाय न पडता एक्सिलेटर वर पाय पडला आणि एका झाडाला खेटून त्यांची गाडी गेली डोक्यात हेल्मेट घातलेले साहेबराव सोनू सांगळे हे आपल्या नियमबद्ध पद्धतीने चालले होते असे प्रत्यय दर्शनी काही युवक सांगत होते. दरम्यान चार चाकी एको गाडी व व त्यांची दुचाकी झाडाच्या मधोमध दाबल्या गेली त्यामुळे त्यांच्या हृदयास जोरदार मार लागून त्यांचे निधन झाले घटनास्थळावर झाडाच्या बुंध्या जवळ रक्त सांडले होते. घटनास्थळावरून त्यांना ताबडतोब नागरिकांनी सिविल हॉस्पिटल येथे हलवले परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांना एक मुलगी दोन नाती आहेत त्या दखील जवळच असलेल्या मुरारी नगर येथे राहत होत्या. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे. आपण घेतलेल्या नवीन घरात राहंन्याच स्वप्न त्यांनी बघितलं होतं. ते अपुरे राहिले. तसेच पंधरा दिवसांनी त्यांच्या मित्रांबरोबर फॅमिली बरोबर ते जम्मू काश्मीर येथे ट्रीप साठी जाणार होते. अतिशय मनमिळाऊ स्वाभिमानी खूप चांगले असे व्यक्तिमत्व होते नातेवाईक मंडळी व सांगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज संध्याकाळी सहा वाजता मोरवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारो नागरिक नातेवाईक उपस्थितीत होते. अंबड पोलीस अधिक तपास करत आहे