तरुणीला युवकां कडून भररस्त्यात मारहाण, ठार मारण्याची धमकी

तरुणीला युवकां कडून भररस्त्यात मारहाण, ठार मारण्याची धमकी
गंगापूररोडवरील कॉलेजबाहेर घडली घटना; युवक ताब्यात प्रतिनिधीं । नाशिक जन्मत
नाशिक शहरात मोठ्या प्रमाणामध्ये प्रेमीयुग्लान मध्ये गैरसमज होऊन एकमेकावर हल्ल्याच्या घटना घडत आहे काल अनंत काणेकर मैदानावर घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती .दुसऱ्याच दिवशी घडली. एक वर्षापासून तरुणीच्या मागे लागलेल्या युवकाने काल गंगापूर रोडवर हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. “गंगापूररोडवर एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तीला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. मंगळवारी (दि. १२) गंगापूररोडवरील एका महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. संशयिताविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडीत १९ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी नेहमी प्रमाणे कॉलेजला आली होती. बाहेर जात असताना शालेय मित्र संशयित अभिजित तुपसुंदर येथे आला. तो मागील एक वर्षापासून पाठलाग करत होता. त्याने रस्त्यात अडवून मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे बोलत डावा हात पकडून जोरात ओढत मारहाण केली. मैत्रिणीने वाचवण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने
तिलाही शिवीगाळ केली. तू पोलिसांत तक्रार केली तर जिवे ठार मारील अशी धमकी देऊन पळून गेला. युवतीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड तपास करत आहे. दरम्यान कॉलेज परिसरामध्ये पोलिसांनी ग्रस्त व बंदोबस्त वाढावी अशी मागणी विद्यार्थ्यांचे पालक करत आहे.