महाराष्ट्र

आमदार कांदेच्या प्रयत्नास यश. करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव निधी मंजूर

3आ. कांदेंच्या प्रयत्नास यश करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव निधी मंजूर

 

अरुण हिंगमीरे

नांदगाव, नाशिक

 

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मनमाड पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सतत शासनाकडे पाठपुरावा करून योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. मनमाड करंजवन योजना मंजूर झाली त्यानंतर आज मितीस अनेक वस्तूंच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली असून योजना अंतिम टप्प्यावर असताना मंजूर झालेली किंमत तसेच आता कामासाठी प्रत्यक्ष लागणारा खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली होती. सदर परिस्थिती आमदार सुहास आण्णा कांदे यांनी प्रशासनासमोर मांडत वाढीव निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला.

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे, पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब या सर्वांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर आज ४ मे २०२२ रोजी वाढीव निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांना सुपूर्द केला.

याआधी योजनेची मंजूर किंमत २५७ कोटी रुपये होती, आणि आता नव्याने वाढीव किंमत ३११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी नेहमीच मतदारसंघातील प्रमुख समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. जसे मनमाड शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे, आणि म्हणूनच आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सतत करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी धडपड करीत आहे.

करंजवन योजने साठी मंजूर झालेल्या निधी मध्ये 15 टक्के लोकवर्गणी भरावयाची असल्याने सदर लोकवर्गणी माफ व्हावी यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विनंती केली असता एकनाथ शिंदे यांनी यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.

मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या निविदा आठवड्याभरात निघणार असून लवकरच या योजनेचा शुभारंभ होणार असल्याने मनमाडकर जनतेसाठी ही एक अतिशय आनंददायी बाब आहे. मनमाड करांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. यानिमित्ताने मनमाड करांना दिलेला शब्द मी पाळला असून हा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही, असे मत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे