येवले तालुक्यात जीवामृत निर्माण करणाऱ्या एन एअरबेटिक फुग्याचा शुभारंभ पत्रकार हरिभाऊ सोनवणे यांनी सेंद्रिय शेतीकडे यशस्वी वाटचाल..

येवले तालुक्यात जीवामृत निर्माण करणाऱ्या एन एअरबेटिक फुग्याचा शुभारंभ
पत्रकार हरिभाऊ सोनवणे यांनी सेंद्रिय शेतीकडे यशस्वी वाटचाल
नाशिक (प्रतिनिधी)
३० वर्ष सक्रिय पत्रकारिता केल्यानंतर हरिभाऊ सोनवणे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.त्याचे कारण म्हणजे प्रत्येक महिन्यात कॅन्सर,डायबेटीस, किडनी अशा गँभिर आजाराचा रुग्ण त्यांचे नातेवाईक भेटत होते, मदत मिळवून देण्यासाठी विनंती करत होते. या अस्वस्थ करणाऱ्या कारणांचा शोध शेतातील पिकावर मारा होत असलेले विषारी औषध यात सापडला, आणि सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
वेळेवर शेतमजुरांचा प्रश्न होताच मात्र स्वतः शेतीत राबून मोठया कष्टाने त्यांनी सेंद्रिय शेतीचा आदर्श उभा केला आहे.
या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडे असलेल्या पावणेसात एकर पैकी 4 एकर बांबू लागवड केली.यापैकी बांबूच्या शेतीत 36 गुंठ्यांत सदाबहार पेरू लागवड केली आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील हा खूप सुंदर अप्रतिम प्रयोग आहे इथे मियावाकी फ्रुट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी आणि अल्ट्रा हायडेन्सिटी या पद्धतीने लागवड केलेली आहे. 36 गुंठ्यामध्ये 2000 रोपांची लागवड करून कमी क्षेत्रात जास्त झाडांचे रोपण करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यावरती भर आहे. अनुदानासाठी शासनाचे नियम अत्यंत किचकट आणि ac ऑफिस मध्ये बसून बनविल्यामुळे अनुदानाकडे दुर्लक्ष करून खर्चिक परंतु शाश्वत उत्पन्न देणारा हा प्रयोग अत्यंत धाडसाने त्यांनी केला आहे.
या प्रयोगामुळे.शेतीचा सेंद्रिय पोत सुधारणार आहे. यासाठी जीवामृत तयार करणारा 6 हजार लिटर क्षमतेचा एन एरेबेटीक फुगा बसविला आहे. हा प्रयोग आज खर्चिक आहे. उद्या उत्पन्न सुरू झाल्यानंतर हा खर्च शुल्लक ठरणार आहे. या अत्यंत शाश्वत उत्पन्न देणाऱ्या प्रयोगाची म्हणजेच जीवामृत पिकाला सोडणाऱ्या कॉकचा शुभारंभ होत असून येवले तालुक्यात हा प्रयोग प्रथमच त्यांनी राबविला आहे.