जातेगांव येथे हिंदू नववर्षाचे भागवत धर्माच्या ध्वजाची मिरवणूक काढून भव्य स्वागत ..
जातेगांव येथे हिंदू नववर्षाचे भागवत धर्माच्या ध्वजाची मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आले.
अरुण हिंगमीरे बोलठाण, दि. २३..
नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे सालाबादप्रमाणे गुरुवारी दि.२३ मार्च रोजी चैत्र शुद्ध द्वितीयेला येथील ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिरापासून ५१ फुट उंच असलेल्या बांबूच्या वरच्या टोकावर भागवत धर्माची पताका (ध्वज) आणि त्यास मोठा पुष्पहार लावून गावातील प्रमुख मर्गावरुन ढोलताशांच्या गजराज
महादेवाचे पुजारी हभप. पंढरीनाथ पवार, सुभाष मेहतर, नाना काटे, नाना पवार, अंकुश वर्पे, उत्तम पवार, कारभारी बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सालाबादप्रमाणे फाल्गुन कृ. पंचमीला रंगपंचमीच्या दिवशी हा ध्वजाच्या
संपूर्ण बांबूच्या काठीला भगव्या रंगाच्या कापडाचे आवरण घालून महादेवाच्या मंदिराच्या समोर लावण्यात येतो. व गुढीपाडव्याच्या दुसर्या दिवशी जमिनीपासून ५ फुट उंचावर सव्वादोन किलो वजन असलेला पितळाचा भरीव नंदी लाकडी फळीवर विराजमान करुन मिवरनुकीत ध्वजाची काठी खाली पडू नये म्हणून चार दिशेने वरच्या बाजूला मोठमोठे दोर बांधून तरुण धरून ठेवतात. त्याची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते. यादरम्यान तरुण नृत्य करतात. ठिकठिकाणी चौकात सुवासिनी ध्वजाचे पुजन करून आणि नंदीस जलाभिषेक करतात, लहान मुलांना त्या पाण्याने आंघोळ घालतात. या ध्वजाच्या मिरवणुकीची सांगता पुन्हा महादेवाच्या मंदिराच्या समोर ध्वज बांधून होते. ह्या ध्वजाची मिरवणूक म्हणजे नवीन मराठी वर्षाचे स्वागत आणि चैत्र वद्य नवमीला येथील श्री पिनाकेश्वर महादेवाचा होणाऱ्या वार्षिक यात्रोत्सवाची सुरुवात असते. त्यानंतर अक्षयतृतीयेला ध्वजाला नैवेद्य दाखवून ध्वज खाली उतरविला जातो.