सिडको विभागीय कार्यालयात सुट्टीच्या दिवशी रंगली ओली पार्टी. आयुक्तांचे चौकशीचे आदेश.
नाशिक जनमत. प्रतिनिधी. सिडको विभागीय कार्यालयात रविवारच्या दिवशी विभागीय कार्यातील अधिकारी कर्मचारी ओली पार्टी झाल्याचे प्रकार उघडीस आला आहे. याबाबत ही बातमी सध्या सिडको परिसरात नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे .नाशिक महानगरपालिका आयुक्त पुलकुड वार यांच्या पर्यंत ही बातमी गेल्याने चौकशीचे आदेश त्यांनी दिलेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून नागरिकांमध्ये देखील चर्चेला उधाण आला आहे कारवाई नक्की होणार का येणाऱ्या काही दिवसात समजणार आहे दोन वर्षांपूर्वी वन विभागाच्या कार्यालय परिसरात देखील रिटायरमेंट निमित्त ओली पार्टी झाली होती. त्यावेळेस पत्रकाराला कुन कून लाग् ल्याने त्याने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेरे टिपला होता यावेळी वनविभागाचया कर्मचाऱ्यांनी मोबाईल व कॅमेरा हिसाकुन पत्रकारावर हल्ला केला होता. कॅमेऱ्यातील मेमरी कार्ड काढून ते गायब केले होते त्यामुळे छायाचित्रण समोर आले नाही यावेळी पोलीस आयुक्त व भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पत्रकाराला ताब्यात घेऊन उलट तपासणी केली होती. पोलीस देखील अशा कर्मचाऱ्यांना आर्थिक संबंध ठेवून पाठीशी घालतात. यामुळे असे प्रकार अनेक शासकीय कार्यालयामध्ये नेहमी घडत असतात. दरम्यान रविवारची सीसीटीव्ही फुटेज पाहून आयुक्त कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे. कारवाई होती की प्रकरण दडपले जाते याकडे नागरिक लक्ष देत आहे.