दैनिक प्रहार चे पत्रकार नितीन चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांना अज्ञात गुंडांकडून मारहाण.
नाशिक जनमत अनेक दिवसापासून नाशिक शहरात वाढत असलेली गुन्हेगारी पोलीस प्रशासनाकडून थांबता थांबत नाही त्यातच अंबड पोलीस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे कालच नागरिकांतर्फे अंबड पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हेगारी थांबावी यासाठी मोर्चा देखील काढण्यात आला होता दरम्यान काल संध्याकाळी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले दैनिक प्रहार चे पत्रकार नितीन चव्हाण व त्यांच्या कुटुंब यावर अज्ञात गुंडांनी घरी येऊन मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. त्यांचे मोठे बंधू व त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस तपास करत आहे घटनास्थळावरचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावा अशी मागणी नितीन चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे दरम्यान या घटनेचा सर्व सरातून निषेध केला. जात आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून हल्ला करणाऱ्या आरोपींना क** शासन करावे अशी मागणी पत्रकार क्षेत्रातून होत आहे.