दहा रुपयाचे नाणे घशात. 40 सेकंदात काढले डॉक्टरांनी बाहेर नवीन तंत्रज्ञान.
दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास राहणार वरखेड बु. तालुका शेगांव जिल्हा बुलढाणा येथील 14 वर्षीय
मंगेश विलास इंदोरे या शेतमजुराच्या मुलाने सहजच 10 रुपयाचे नाणे तोंडात ठेवले, व बघता बघता ते नाणे त्याच्या घशात गेले व त्याला घशात वेदना व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याने याबाबत वडिलांना सांगितले. वडील श्री विलास इंदोरे यांना शेगांव येथील बालरोगतज्ज्ञ डॉ सचिन प्रकाशराव सांगळे यांनी याआधी असे अन्न नलिकेत अडकलेले नाणे काढल्याचे ज्ञात असल्याने, मुलाला तात्काळ डॉ सांगळे यांच्या अग्रसेन चौक शेगांव स्थित प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल येथे आणण्यात आले, तेथे पोहचताच मुलाचा एक्स रे काढून नाणे अडकल्याची जागा निश्चित करण्यात आली. व डॉ सांगळे व त्यांच्या टीम ने वैद्यकीय क्षेत्रात नविन अविष्काराप्रमाणे शोधून काढलेल्या पद्धतीचा वापर करून फोलिज कॅथेटरच्या मदतीने *अवघ्या 40 सेकंदात* मुलाला कुठलाही त्रास न होऊ देता विनाशस्त्रक्रिया अन्न नलिकेत अडकलेले नाणे बाहेर काढले. व या कौशल्यात आपण निष्णात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.”
त्यांच्या या नविन पद्धतीमुळे आजवर अनेक मुलांचे प्राण वाचले असून, सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा नाणे काढतांनाचा विडिओ सर्व सोशल मीडियावर वायरल होत असून सर्वत्र कुतूहलाचा विषय बनला आहे.