देशाच्या शाश्वत विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प- -प्रदीप पेशकार*
*देशाच्या शाश्वत विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प- -प्रदीप पेशकार*
अर्थमंत्र्यांनी सर्व घटकांना दिलासा मिळेल असा सर्व स्पर्शी अर्थसंकल्प सादर केला आहे युवकांच्या अशाकांक्षा म्हणजेच रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देणारा तसेच मध्यमवर्गीयांना आयकारात घसघशीत सूट देऊन स्वप्नपूर्ती कडे नेणारा अर्थसंकल्प म्हणता येईल. पायाभूत सुविधांसाठी केलेली दहा लाख कोटींची तरतूद व त्यातून निर्माण होणारे रोजगार तसेच एक कोटी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्याचा मानस आणि कस्टम ड्युटी मध्ये अनेक उत्पादनांना दिलेली सूट हे उल्लेखनीय आहे. सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी नऊ हजार कोटीचे वाढवलेली क्रेडिट गॅरंटी रक्कम त्यातून मिळणारे दोन लाख कोटींचे कर्ज हे स्वागतार्ह बाब आहे. ग्रीन ग्रोथ ला चालना देताना ग्रीन हायड्रोजन मिशन आणि राज्य व केंद्र सरकारच्या गाड्या ह्या कल मध्ये रूपांतरित करण्यासाठी अर्थसहाय्य आणि स्क्रॅपिंग पॉलिसी ची अंमलबजावणी यामुळे पर्यावरण पूरक उपाययोजनेचा अर्थसंकल्प असेही आपण म्हणू शकतो. इज ऑफ डूइंग बिजनेस च्या संदर्भामध्ये सुलभीकरण लघु उद्योगासाठी केलेले आहे. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म हा सुद्धा अनेक उद्योगाच्या पर्यायाने रोजगाराच्या संधी घेऊन येणार आहे. एकंदरीतच सर्व स्पर्शी विकासची खात्री देणारा अर्थसंकल्प आहे.
*प्रदीप पेशकार*
प्रदेश अध्यक्ष,
भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र
सदस्य,
नॅशनल बोर्ड फाॅर
एम एस एम ई.
भारत सरकार.