ब्रेकिंग
उत्तर काशी मध्ये बस खोल दरीत कोसळून 25 भाविकांचा मृत्यू तीन जण गंभीर जखमी दोन बेपत्ता.
- नाशिक जनमत. उत्तराखंडामधील उत्तर काशी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी भाविकांना घेऊन जाणारी मध्यप्रदेश येथील एक बस राष्ट्रीय महामार्ग 94 वर टमाटा गावापासून दोन किमी अंतरावर जानकी चडी गावा जवळ खोल दरीत कोसळली या अपघातामध्ये 25 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती येत आहे बस मधील हे लोक मध्य प्रदेश यात्रेकरू आहेत तीन जण गंभीर जखमी दोन जण बेपत्ता आहे एकूण बस मध्य 30 यात्रेकरू भावीक होते. ही सर्व भावीक मध्य प्रदेशामधील पन्ना जिल्ह्यातील आहेत ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे कळते पाचशे मीटर खोल दरीमध्ये बस कोसळली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग यांना फोन करून माहिती घेतली बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले आहे
संग्रहित फोटो उत्तर काशी बस आपघात.