वंजारी वधु वर मेळावा ग्रुप तर्फे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला
नाशिक जनमत प्रतिनिधी आज नासिक शहरातील इंद्रा नगर भागातील हॉटेल मंजली येथे वंजारी वधु वर मेळावा ग्रुप तर्फे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शेकडो वंजारी समाज बांधवांनी सहभाग नोंदवला या या कार्यक्रमाचे नियोजन वधू-वर मेळाव्याचे संस्थापक परचडे मच्छिंद्र भागाजी सर यांनी केले होते प्रमुख पाहुणे म्हणून भानुदास पालवे अपर जिल्हाधिकारी नाशिक होते तसेच मुंबई ठाणे कल्याण संगमनेर येवला इत्यादी भागातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव आले होते अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आपली ओळख करून देताना आपल्या मुला मुलींची नावे सांगितली तसेच आतापर्यंत वधु वर मेळावा मध्ये जवळपास 200 शुभविवाह जमवण्यात आले तसेच अनेक घटस्फोटित तरुणांचे व तरुणीचे देखील संसार पुन्हा जुळवण्यात आले. एक रुपया न घेता हे शुभविवाह करण्यात आले या कार्यक्रमास निवृत्ती नागरे श्री बाळासाहेब घुगे आनंद सानप मारुती उगलमुगले नानेश्वर घुले रणजीत आंधळे विमलताई आव्हाड सविता केकाने संजय गाभणे बाम्हवली कॉलेजचे डॉक्टटर विजय वाघ शो वाघ मॅडम विलास सानप सर व विक्रम उगले यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख्याने घटस्फोट लग्न
झाल्यानंतर मुलीच्या आईने हस्तक्षेप केल्याने मुला मुलींचे संसार मोडल्या त्यामुळे हस्तक्षेप टाळून घटस्फोट होऊ देऊ नये असे यावेळी परचडे सर बोलले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळेस अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले अशा प्रकारचे कार्यक्रम स्नेहसंमेलन नेहमी झाले पाहिजे आपला समाज हा कष्टकरी समाज आहे शेतकरी वर्गा चे मुलांची लग्न जमली पाहिजे त्यासाठी देखील समाजाने एकत्र येऊन मदत केली पाहिजे आज समाजात मधील्यू युवक अनेक औद्योगिक व विविध क्षेत्रांमध्ये वंजारी समाज हा पुढे आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी समाजासाठी मोठे योगदान दिलेले आहे आपण देखील
आपले योगदान समाजासाठी दिले पाहिजे समाज परिवार असून परिवाराचे हित साधले पाहिजे असे विक्रम उगले यांनी सांगितले कार्यक्रमस्थळी चहा नाश्ता व मस्तपैकी अल्पहार ची व्यवस्था केलेली होती. यावेळेस अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पत्रकार चंद्रकांत धात्रक यांचा
देखील अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सत्कार केला कार्यक्रमास वंजारी समाजातील बहिणी व भाऊंनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली सूत्रसंचालन सानप सर यांनी केले तर मच्छिंद्र भागाजी परचुंडे सर यांनी आभार माडले.