कृषीवार्ता

मान्सून काळात औषध साठा मनुष्यबळ ऑक्सीजन यंत्रणा सज्ज ठेवावी.

7 दिनांक: 06 जून, 2022

 

नाशिक जनमत ♥*मान्सून काळात औषधसाठ्यासह मनुष्यबळ व ऑक्सिजन यंत्रणा सज्ज ठेवावी;* *कोविडसाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात*

*जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या आरोग्य विभागास सूचना*

 

*नाशिक, दिनांक: 06 जून, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*

मान्सून काळात कोविड-19 सारख्या साथरोगांचा उद्रेक होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून रोग पसरणार नाही यासाठी जनजागृती करावी. तसेच त्यादृष्टीने आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ व ऑक्सिजन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकारणाने आरोग्य विभागास दिल्या आहेत.

 

जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने कळविल्यानुसार, मान्सून काळात विभागनिहाय जबाबदारी निश्चीत करून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. तसेच आवश्यक औषधे व पुरेशा वैद्यकिय सुविधा व वैद्यकिय पथकासह अँब्युलन्स घटनास्थळी पुर्ण वेळ उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे. घटनेच्या गांभीर्यानुसार तसेच साथीचे आजार प्रसरणार नाही यासाठी घटनास्थळी सुसज्ज वैद्यकिय कॅम्प सुरु करण्यासाठी पथकांची नियुक्ती करावी. आवश्यकतेनुसार इतर वैद्यकिय मदत तज्ञ डॉक्टर्स, रक्ताच्या बाटल्या, औषधे, वैद्यकिय उपकरणे इत्यादी अनुषंगिक बाबी उपलब्ध करून संचिका तयार करावी.

 

मान्सून काळात कोविड- 19 च्या अनुषंगाने लसीकरण मोहिमेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. तसेच अतिवृष्टी, चक्रीवादळामुळे कोविड सेंटर्स व रूग्णालयातील रूग्णांना स्थलांतरीत करण्याची वेळ आली तर पर्यायी व्यवस्थेचा आराखडा तयार ठेवावा. रूग्णांना स्थलांतरीत केलेल्या इमारतीमध्ये ऑक्सिजन व्यवस्था अद्ययावत आसावी. बॅटरी बॅकअप व पर्यायी विद्युत व्यवस्था असवी. अतिवृष्टीमुळे रूग्णसेवेवर कोणताही परिणाम होवू नये यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने आरोग्य यंत्रणांना दिल्या आहेत.

 

त्याचप्रमाणे कोविड सेंटर्सला रुग्ण व शव वाहिका यांची सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच पुरात अडकलेल्या लोकांना तात्काळ वैद्यकिय सेवा व लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे. याबरोबरच सर्व हॉस्पिटल्सची स्वच्छता करून, पिण्याचे पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासाणी करून त्याबाबतचा परिक्षण अहवाल प्राधिकरणाला यांना सादर करावा. पोस्ट मॉर्टेम रीपोर्ट, मनुष्य शरीर डिस्पोजल याबाबतचा आराखडाही तयार करण्यात यावा. घटनास्थळी नेमणूक करण्यात आलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना मान्सूनपूर्व प्रशिक्षण देण्यात यावे. रोगप्रतिकारक औषधांचा पुरवठा, साथीचे आजारावर नियंत्रण, अन्न, पाणी पुरवठा, स्वच्छता, टाकावू पदार्थ विल्हेवाट, मदत करणा-या सेवाभावी संस्था यांची एकत्रित माहिती असणारी यादी तयार करावी.

 

जिल्ह्यातील रक्तपेढ्यांसोबत समन्वय ठेवून पुरेशा प्रमाणात रक्त साठा उपलब्ध करून ठेवण्यासाठी नियोजन करावे. मान्सून काळात नागरिकांना तात्काळ माहिती व आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी रूग्णालयांमध्ये माहिती केंद्र व आपत्तीग्रस्त भागात नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात यावी. मान्सून कालावधीत सामान्य व ग्रामीण रुग्णालय, शहर विभागातील दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक मनुष्य बळासह अतिरिक्त बेड सुसज्य ठेवावे गंभीर जखमींना सुसज्ज अशा रुग्णवाहिकेतून पुढील उपचारार्थ योग्य त्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या संदेशावर तत्काळ कारवाही करण्यात यावी, अशा सुचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने आरोग्य यंत्रणेला दिल्या आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे