महाविकास आघाडी सरकारने कोरोणा काळात लसीच्या मात्रे सोबत दिली विकासाची मात्रा
दि. ४ मे, २०२२
*महाविकास आघाडीसरकारने*
*कोरोनाकाळात लसीच्या मात्रेसोबत दिली विकासाचीही मात्रा !*
*प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया*
*_प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस_*
*नाशिक, दि.4 मे,2022
कोरोनाकाळात सगळे बंद असतांना महाविकास आघाडी सरकारने आपल्या अखंड सेवेचा वसा सुरु ठेवला होता. शासनाने कोरोनाकाळात लसीची मात्रा देण्याबरोबरच सर्व घटकांचा विचार करुन विकासाचीही मात्रा दिली आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या आहेत. या सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाचा उद्या अखेरचा दिवस आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
मीडिया सेंटर, बी.डी.भालेकर मैदान, कवी कालिदास कलामंदिरासमोर आयोजित ‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडी’ ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाला तापमानाचा पारा 40 च्या वर असतानाही सुजाण आणि जागरूक नाशिककरानी भेट दिली. त्यातील अनेकांनी प्रत्येक माहिती फलकाचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून संग्रही ठेवले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देवून शासनाच्या कामांविषयी समाधान व्यक्त केले आहे.
*शासनाने राबविले उपक्रम अतिशय प्रभावी : ज्योती चितळकर, महिला*
गेल्या दोन वर्षात संपूर्ण जग कोरोनासंकटाचा सामना करत होता. या आपत्कालीन परिस्थितीतही महाविकास आघाडीशासनाने सर्वच घटकांच्या विकासासाठी राबविलेले उपक्रम अतिशय प्रभावी असल्याचे या प्रदर्शनातून दिसून आले आहे.
*सरकारच्या दमदार कामगिरीची मुसाफीरी : रविंद्र सोनस,उपमुख्याधापक,न्यायडोंगरी*
‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडी’ ची मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या प्रदर्शनाची पाहणी अत्यंत बारकाईन पाहिले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून असे लक्षात आले की, कोरोनाकाळातही महाराष्ट्र राज्याचे काम प्रगतीपथावर आहेत. प्रदर्शनातील माहिती ज्ञानदानासाठी उपयुक्त असून संपूर्ण प्रदर्शन पाहतांना सरकारच्या दमदार कामगिरीची मुसाफीरी केल्या चा अनुभव आला आहे, अशी भावना न्यायडोंगरीचे उपमुख्याधापक रविंद्र सोनस यांनी व्यक्त केली आहे.
*मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न समजले : शैला मोगल, शिक्षिका*
मराठी भाषेचे संवर्धन व आपल्या मातृभाषेला जपणं आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या प्रदर्शनात मराठीचा सन्मान, मराठी अभिमान याचे जाहिरात फलक पाहून समाधान वाटले. मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यासाठी महाविकास आघाडी शासनाचे सुरु असलेले प्रयत्न समजले, अशी प्रतिक्रीया शैला मोगल यांनी व्यक्त केली.
प्रदर्शनात अल्पसंख्याक समुदायाच्या सर्वांगिण विकासासाठीच्या योजनांची माहिती घेतांना अल्पसंख्यानी समाधान व्यक्त केले. अल्पसंख्याक उमेदवारांसाठी असलेले शिक्षण व प्रशिक्षणाची माहिती घेतली.
*प्रदर्शनाचा आज अखेरचा दिवस*
मीडिया सेंटर,बी.डी.भालेकर मैदान, कवी कालिदास कलामंदिरासमोर आयोजित दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडी ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाचा आज अखेरचा दिवस आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालय, नाशिकचे उपसंचालक(माहिती) ज्ञानेश्वर इगवे यांनी केले आहे.
000000000