ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे काम प्रेरणादायी. चंदुलाल शहा.
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे काम प्रेरणादायी
चदुलाल शाह: ब्रह्माकुमारी पुष्पादिदी यांचा वाढदिवस बालनिरिक्षण गृहात साजरा
नाशिकः
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे काम भारतासह १४० हून अधिक देशात सुरू आहे. त्यांचे अनेक उपक्रम आध्यात्मा बरोबरच समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यात ब्रह्माकुमारी पुष्पादिदी यांचे देखिल मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन निरीक्षण गृहाचे सचिव तथा ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शाह यांनी केले.
ब्रह्माकुमारी पुष्पादिदी यांचा वाढदिवस उंटवाडी परिसरातील बालनिरिक्षण गृहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्याना मिठाई, फळ वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पत्रकार भागवत उदावंत, हितेश शहा, राज्य अपंग संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब सोनवणे म्हणाले की, ध्यान, राजयोग, आत्म्याचे मार्गदर्शन या विश्वविद्यालयातून देश विदेशात सोप्या भाषेत समजावून सांगितले जात आहेत. नाशिकच्या उत्तर महाराष्ट्रच्या मुख्य संचालिका वासंतीदिदी यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पादिदी आणि सर्वच केंद्र संचालिका उत्कृष्ट काम करत आहे. विद्याथिनिनी ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी यांचे औक्षण केले. त्यानंतर दीदींनीही सत्काराला उत्तर देताना आत्मविश्वासाच्या जोरावर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याच बरोबर परिश्रम, चिकाटी हे गुण आणि संत, महापुरुषांचे दररोज एक तरी विचार आत्मसात करावे, असे विद्यार्थ्याना आवाहन केले. कार्यक्रमास ब्रह्मकुमार विशाल, ब्रह्माकुमारी कोमालदिदी, ब्रह्माकुमारी नीताबेन, ब्रह्माकुमारी मृणाल, मंदामाता यांच्यासह बलनिरिक्षण गृहाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
- नाशिकः बालनिरिक्षण गृह येथे वाढदिवसनिमित्त ब्रह्माकुमारी पुष्पादिदी यांचा सत्कार करतांना चंदुलाल शाह. समवेत बाळासाहेब सोनवणे, भागवत उदावंत, हितेश शाह आदी.