जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरातील दान पेटी चोरांनी फोडल्या. एक लाख रुपयांची चोरी अंदाजे. चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद.
नाशिक जनमत नांदगाव तालुक्यातील जातेगांव पासून उत्तरेस असलेल्या डोंगरावरील श्री पिनाकेश्वर महादेव मंदिरातील आणि सभामंडपातील अशा दोन दानपेट्या चोरट्यांनी सुमारे ५०० मिटर लांब नेवून त्यातील रोख रक्कमेवर डल्ला मारला.
सदर घटना ही दि.१८ मार्च रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडलेली असून त्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.
नियमित पूजा विधीसाठी पहाटे आलेल्या पूजारी व भाविकांना सदर दानपेट्यांची चोरीची झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी
देवस्थान विश्वस्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दोन्ही दानपेटीतील भाविकांनी दान केलेले अंदाजे रोख रक्कम एक लाख रुपये चोरी झाले असले बाबत पोलिस प्रशासनाला कळविले. त्यानंतर पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, आणि पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी करुण अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही सीलबंद असलेल्या दानपेट्या चोरट्यांनी मंदिर परिसरा पासून १०० आणि ५०० मीटर अंतरावर नेवून आतील सुमारे एक लाख रुपये रकमेवर डल्ला मारून दान पेट्या तेथेच टाकून पोबारा केला असल्याचे दिसून आले.
वरील घटनेचा तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत.
या घटनेचा पंचक्रोशीतील तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला असुन चोरट्यांनी भाविकांच्या श्रध्दा, भावनेचा झालेला अपमान आहे. अशा दूष्प्रवृत्तींचा जाहीर निषेध करण्यात येत असून लवकरात लवकर सदर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करण्यात यावी. अशी भावना युवासेनेचे गुलाबराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे.