नाशिक जनमत. जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने. व तसेच विदर्भात व मराठवाड्यात पाऊस गारपीट झाल्याने नाशिक जिल्हा पूर्णपणे गार्थलेला होता. निफाड येथील तापमान तपमान 8.4 खाली आले होते त्यामुळे द्राक्ष पीक धोक्यात आले होते दरम्यान कालपासून थंडी कमी झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे कांदा गहू हरभरा या पिकाचे थंडी असेल तर पिकासाठी चांगली मानली जाते परंतु थंडी बरोबर आभाळ असेल तर पिकाचे नुकसान होते. दररोज होणाऱ्या हवामान बदलामुळे सर्दी पडसे खोकला. या प्रकारची लक्षणे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे करुणा चे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.